शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
5
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
6
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
7
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
8
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
9
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
10
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
11
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
12
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
13
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
14
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
15
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
16
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
17
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
18
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
19
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 17:32 IST

Karad South Vidhan Sabha Election Result 2024 Live : सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. अतुल भोसले जायंट किलर ठरले आहेत.

Karad South Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live   : कराड : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकाचे निकाल सुरु झाले आहेत. या निवडणुकीत आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल हाती आले आहेत.या निकालात महायुतीने स्पष्ट बहुमताच्या दिशेने चालली आहे. या विधानसभेच्या निकालात महायुतीला चांगली आघाडी मिळालेली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. अतुल भोसले जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी तब्बल ३८ हजार ५४५ मतांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला आहे. या पराभवामुळे काँग्रेसच्या आजवरच्या एकहाती वर्चस्वाला अक्षरशः सुरूंग लागला असून भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे.

(Maharashtra Election Results 2024)

मागील दोन विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत कराड दक्षिण मतदार संघातून धक्कादायक निकाल आलेला आहे. भाजपच्या अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला आहे. अतुल भोसले यांना एकूण १ लाख ३७ हजार २८९ मत मिळाली. तर, पृथ्वीराज चव्हाण यांना एकूण ९८ हजार ७४४ मतं पडली आहेत.

दरम्यान, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा नेहमीच प्रभाव राहिला आहे. काँग्रेसने याठिकाणी सात वेळा विजय मिळवला आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचा अशा प्रकारे धक्कादायक पराभव झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४karad-south-acकराड दक्षिणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024