शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

कदम यांची बंदद्वार चौकशी

By admin | Updated: August 18, 2016 00:56 IST

बुलडाणा येथे आरोपी आमदार कदम यांच्या चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. १७ : बुलडाण्यासह राज्यातील विविध ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कार्यालयातील घोटाळाप्रकरणी मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांची १७ ऑगस्ट रोजी येथील कारागृह रस्त्यावरील सीआयडी कार्यालयात दिवसभर बंदद्वार चौकशी करण्यात आली. दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी पोलीस कोठडीची मुदत संपणार असल्याने न्यायालयात हजर केल्यानंतर तपास करणारे सीआयडी पथक आरोपी रमेश कदम यांची अधिक चौकशीसाठी पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.ऑगस्ट २0१२ ते डिसेंबर २0१४ या काळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना आरोपी आमदार रमेश कदम यांनी महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या निधीचा घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी पुणे येथील सीआयडी पथकाने आमदार कदम यांना सोबत घेतले आहे. दरम्यान, १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे १७ ऑगस्ट रोजी सीआयडी पथकाने दिवसभर बंदद्वार चौकशी केली. या प्रकरणी तपासादरम्यान पथक आरोपी कदम यांना व्हीआयपी सुविधा पुरवित असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित होताच सर्वत्र खळबळ उडाली. या वृत्तानंतर आरोपी कदम यांना व्हीआयपी सुविधा पुरविण्यात आली नाही. सकाळी शहर पोलीस स्टेशनच्या कोठडीतून थेट सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी कदम यांना नेण्यात आले. या ठिकाणी दिवसभर बंदद्वार चौकशी सुरू होती. मोठे मासे गळाला लागणार?आरोपी आमदार रमेश कदमकडून येथील कार्यालयाकडून कोण-कोणत्या लाभार्थींना धनादेश देण्यात आले, लाभार्थींनी धनादेश कसे वटविले आदींबाबत तांत्रिक माहिती सीआयडी पथकाने घेतल्याचे समजते. या चौकशीनंतर बुलडाण्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 'लोकमत'च्या वृत्ताने खळबळ; 'व्हीआयपी' सुविधा बंद!आरोपी आमदार रमेश कदमला बुलडाण्यात व्हीआयपी सुविधा पुरवित असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने १७ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ उडाली. यानंतर १८ ऑगस्टला कदमला कुठलीही व्हीआयपी सुविधा पुरविण्यात आली नाही.