शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या शुभेच्छांचा जगावेगळा ‘आनंद’

By admin | Updated: May 24, 2014 02:53 IST

‘मित्रांनो, गेली तीनहून अधिक वर्षे फेसबुकवर वापरतोय. पण आजपर्यंत कधी माझा वाढदिवस मी जाहीर केला नव्हता. कित्येकदा तर रेकॉर्डिंग, तालमीच्या निमित्ताने मुंबईत असायचो.

पुणे-पिंपरी : ‘मित्रांनो, गेली तीनहून अधिक वर्षे फेसबुकवर वापरतोय. पण आजपर्यंत कधी माझा वाढदिवस मी जाहीर केला नव्हता. कित्येकदा तर रेकॉर्डिंग, तालमीच्या निमित्ताने मुंबईत असायचो. त्यामुळे शुभेच्छापत्रे, फोन अगर एसएमएस यांचा वाढदिवशी अभाव असायचा. या वर्षी अनपेक्षित ‘लोकमत’मध्ये माझा फोटो आणि वाढदिवसाच्या अभिनंदनाचा मजकूर प्रसिद्ध झाला आणि माझ्यावर फोन, ईमेल, फेसबुकवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. प्रसिद्धीसाठी तहानलेल्यांच्या या जगात मी जगावेगळा... तेव्हा या सगळ्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. आणि शक्यतोवर माझी जन्मतारीख येथेच विसरून जा, ही विनंती. तुम्हा सर्वांच्या चिरकाल प्रेमाची साक्ष पटलीये. त्यामुळे दरवर्षी याच्या पुनरावृत्तीची गरजच नसावी. प्रयोगशील संगीतकार आनंद मोडक आज काळाच्या पडद्याआड गेले, आणि त्यांच्या फेसबुकवरील ही त्यांची पोस्ट वाचून सगळ्या कलावंतांना गहीवरून आले. ‘लोकमत’मध्ये वाढदिवस हा स्तंभ दररोज प्रसिद्ध होतो. यामध्ये १३ मे रोजी मोडक यांचा वाढदिवस प्रसिद्ध झाला; आणि या अनपेक्षित अभीष्टचिंतनाने ते भारावून गेले. त्या दिवशीच्या फेसबुक पोस्टमध्ये ते लिहितात, ‘या वर्षी अनपेक्षितपणे ‘लोकमत’मध्ये माझा फोटो व वाढदिवसाच्या अभिनंदनाचा मजकूर प्रसिद्ध झाला आणि माझ्यावर फोन, ईमेल, फेसबुकवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. खरेतर प्रसिद्धीसाठी तहानलेल्यांच्या या जगात मी जगावेगळा. अनपेक्षित अशा या प्रेमळ भडिमाराने क्षणभर सुखावलो खरा; पण गुदमरलो. इतक्या मंडळींना माझ्याबद्दल वाटणार्‍या कौतुकभरल्या प्रेमाच्या प्रचितीने चकित झालो. हे कधी माझ्या जाणिवेतही नव्हते. किंबहुना मी स्वत:ला कुरूप वेडे पिलू समजत आलोय. त्यामुळे कोणाकडूनही कधी अशा प्रेमाची अपेक्षाच केली नाही. त्यामुळे खरेतर गांगरून जायला झाले. तेव्हा या सगळ्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. आणि शक्यतोवर माझी जन्मतारीख येथेच विसरून जा, ही विनंती. तुम्हा सर्वांच्या चिरकाल प्रेमाची साक्ष पटलीये. त्यामुळे दरवर्षी याच्या पुनरावृत्तीची गरजच नसावी. तुम्हा सर्वांचे पुनश्च हार्दिक आभार आणि अनेकोत्तम शुभेच्छा...’ ‘मराठी संगीतातील सुप्रसिद्ध संगीतकार हरपला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी शब्दरूपी श्रद्धांजली स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वाहिली. दिग्दर्शक सचिन कुंडलकर म्हणाले, ‘अतिशय सुंदर अशा चाली, गीते देणारा संगीतकार आपल्यातून हरपला आहे. (प्रतिनिधी)