शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीला १९३ कोटींचा तोटा

By admin | Updated: September 22, 2015 01:59 IST

देशातील अग्रेसर, देशातील एकमेव युवा पोर्ट असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीचा असलेला जेएनपीटी कंटेनर टर्मिनल२०१४-१५ या आर्थिक वर्षात १९३ कोटी तोट्यात आहे

उरण : देशातील अग्रेसर, देशातील एकमेव युवा पोर्ट असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीचा असलेला जेएनपीटी कंटेनर टर्मिनल२०१४-१५ या आर्थिक वर्षात १९३ कोटी तोट्यात आहे. त्यामुळे दोन वर्षापूर्वी जागतिक प्रमुख १०० बंदरात २६ व्या स्थानावर असलेल्या जेएनपीटी बंदर आता ३० व्या स्थानापर्यंत घसरले आहे.जेएनपीटी बंदर १९८९ साली उभारण्यात आले. २६ वर्षात जेएनपीटीने नव्याने बांधलेली दोन शहरे बीओटी तत्त्वावर खाजगी कंपन्यांना दिली आहे. खाजगी दोन आणि जेएनपीटीचे स्वत:च्या मालकीचे अशी एकूण तीन बंदरे सध्या कार्यरत आहेत. जेएनपीटीच्या बंदरात प्रशासन, इस्टेट पोर्ट अ‍ॅण्ड डॉक, कंटेनर, बल्क आदी विभागत १,६७८ कामगार काम करीत आहेत. खाजगी दोन्ही बंदराकडे कमी कामगार आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे दोन्ही खाजगी बंदरे कमी कामगार आणि अत्याधुनिक सुविधांच्या जोरावर जेएनपीटी कंटेनर टर्मिनलपेक्षाही अधिक कंटेनर मालाची हाताळणी करीत आहे. त्यामुळे जेएनपीटी कंटेनर टर्मिनल २०१४-१५ या आर्थिक वर्षात १९३ कोटी ८७ लाख ३४ हजार ७९ रुपयांची तोट्यात आहे. जेएनपीटीला इतर खाजगी बंदरांकडून मिळणारे भाडे, रॉयल्टी, इस्टेट बल्क, इस्टेट, पोर्ट अ‍ॅण्ड डॉक यातून सर्व मिळणाऱ्या उत्पन्नामुळे जेएनपीटीला वार्षिक ५०० कोटी रुपयांचा नफा मिळत असला तरी जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीचा असलेला जेएनपीटी कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी) २०१४-१५ या आर्थिक वर्षात मात्र सुमारे १९४ कोटी तोट्यात असल्याची माहिती जेएनपीटीच्या अधिकृत सूत्रांनी दिली.जेएनपीटी बंदरात पायाभाूत सुविधांचा असलेला स्वभाव, कामगारांना देण्यात येणारे विविध फायदे, जेएनपीटीने चालविलेली नाहक उधळपट्टी, कामगारांची आंदोलने, घटलेली उत्पादन क्षमता, संप, बंद, कामचुकार कामगार, सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी आदी विविध कारणांमुळे जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनल कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळेच जेएनपीटी कंटेनर टर्मिनल तोट्यात असल्याचा दावा जेएनपीटीच्या अधिकृत सूत्रांनी केला आहे. (वार्ताहर)