बारामतीत झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या. त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचं निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. "दादा नसतील ही जाणीवच अंगावर काटा आणणारी, प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले" असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.
"महाराष्ट्राच्या राजकारणात आता दादा नसतील ही जाणीवच अंगावर काटा आणणारी आहे. कामाचा प्रचंड आवाका आणि उरक असणारा हा लोकप्रिय लोकनेता नियतीने आज आपल्यापासून हिरावला. प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले…! अधिक लिहवत नाही. शब्द अपुरे आहेत आणि भावना गोठल्या आहेत. पवार कुटुंबियांच्या या दुःखद प्रसंगात आम्ही सहभागी आहोत" असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
"मतभेद होते पण आदर कायम..."; अजित पवारांच्या निधनाने प्रियंका चतुर्वेदींना अश्रू अनावर
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी अजित पवार यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. "ही घटना अत्यंत धक्कादायक, वेदनादायी आणि हृदयद्रावक आहे" असं एएनआय (ANI) शी बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. "राजकीय पातळीवर आमच्यात मतभेद असले तरी आदर कायम होता, आम्ही एकत्र काम केलं आहे. अजित पवार हे कामाप्रती पूर्णपणे समर्पित असलेले नेते होते" अशा शब्दांत त्यांनी पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रियंका यांना अश्रू अनावर झाले.
Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati airport. He was en route to campaign for local elections. Jitendra Awhad and Priyanka Chaturvedi expressed profound grief over Pawar's untimely demise, recalling his dedication and impact.
Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार का बारामती हवाई अड्डे के पास एक विमान दुर्घटना में दुखद निधन हो गया। वह स्थानीय चुनावों के लिए प्रचार करने जा रहे थे। जितेंद्र आव्हाड और प्रियंका चतुर्वेदी ने पवार के असामयिक निधन पर गहरा शोक व्यक्त किया, उनकी निष्ठा और प्रभाव को याद किया।