शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 17:00 IST

jitendra awhad on uddhav thackeray: जितेंद्र आव्हाड असं नेमंक का म्हणालेत? वाचा...

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाची गंभीर होत चाललेली परिस्थिती, बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता यांमुळे एका बाजूला जनता त्रस्त झाली असताना विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्ष ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका कवितेतून भाजपला सणसणीत चिमटा काढला आहे. (jitendra awhad criticised bjp leader through poem over uddhav thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. मात्र, भाजपकडून केल्या जाणाऱ्या टीकेचा जितेंद्र आव्हाड यांनी कवितेतून खरपूस समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक शैलीत ही कविता लिहिली असून त्यातून त्यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. ही कविता फेसबुकवर शेअर करण्यात आली आहे. 

निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!कधी थाळ्या वाजवायलालावल्या नाही…ना कधी मेणबत्या आणि दिवेलावायला लावले …निर्णय घेताना घेतलेविश्वासात…विरोधकांचे त्यामुळेचफावले……शांत राहून तो लढत आहेविरोधकांचे खरंच राईट आहे…खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

मंदिर उघडा, बाजार उघडाशाळा उघडा ते म्हणाले…परीक्षा पुढे ढकलल्या तरते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले…कोरोना वाढला तर ते आताफक्त सरकारला दोषी ठरवत आहे…विरोधकांचे खरंच राईट आहे…खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

इमान तर विकले नाहीचना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या…कोरोनाचे आकडे लपवले नाहीचखोट्याने न कधी माना झुकल्या…घरी पत्नी आणि मुलगाआजारी असतांना तो मात्र लढत आहे…विरोधकांचे खरंच राईट आहे…खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

ना कुठे बडबोलेपणाना कशाचा बडेजाव..आठ हजार कोटीचेविमान नको…ना कोणत्या प्रकरणातघुमजाव……जे करतोय ते प्रामाणिकपणेतो करतो आहे…विरोधकांचे खरंच राईट आहे…खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय…विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय…गोरगरीब जनतेलाएकवेळ शिवभोजन मोफत देतोय…निसर्ग चक्रीवादळ, कोरोना संकटशेतकऱ्यांच्या अडचणीसाठी तो शांततेत लढतो आहे ……विरोधकांचे खरंच राईट आहे…खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

ना क्लीन चिट देता आली…ना खोटी आकडे वारी देता आली…निवडणूक काळात तर कधीना अशक्य घोषणा त्याला करता आली…जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय…विरोधकांचे खरंच राईट आहे…खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

महाराष्ट्राचे मीठ खाऊननिधी पंतप्रधान निधीला ते देताय…उठसूठ, सकाळ संध्याकाळते टीका सरकार वर करताय…तो मात्र टिकेला उत्तर न देतासर्वसामान्यांसाठी झटत आहे…विरोधकांचे खरंच राईट आहे…खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…!!

– डॉ.जितेंद्र आव्हाड 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpravin darekarप्रवीण दरेकरchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा