धुळे : जळगाव घरकूल प्रकरणातील सशंयित आरोपी आमदार सुरेशदादा जैन यांना परवानगी न घेता परस्पर मुंबई येथे उपचारासाठी पाठविल्याने विशेष न्यायालयाने हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या पॅनलला कारणेदाखवा नोटीस बजावली होती. यावरील बुधवारी कामकाज प्रसंगी ‘आमची चूक झाली, आम्हाला माफ करा’ अशी याचना डॉक्टरांच्या पॅनलने विशेष न्यायालयापुढे केली. तसेच या संदर्भात लेखी खुलासा सादर करण्यासाठी मुदत मागितली. जैन यांना पोटाचा त्रास जाणवत होता. ते उपचारासाठी काही दिवस जिल्हा सर्वाेपचार रूग्णालयात दाखल होते. त्याविषयी मोठ्या आतड्यांना सूज असल्याचा अहवाल आला होता. पुढील उपचारासाठी १६ मे रोजी त्यांना मुंबई येथे पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}