शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

शरद पवार यांना वारंवार 'मातोश्री'वर हेलपाटे मारायची वेळ आणणे योग्य नाही : चंद्रकांत पाटील  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 18:49 IST

शरद पवार यांच्या वयाचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते... 

ठळक मुद्देजनतेच्या हितासाठी आम्ही सरकारबरोबर काम करायला तयार आहोत. 

पुणे : प्रणव मुखर्जीं यांना राष्ट्रपती करायचे होते तेव्हा २००४ साली सोनिया गांधी यांनी सांगितल्यामुळे, शिवसेनेची मते मागायला शरद पवार मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर थेट आत्ता व गेल्या आठवड्यात तर दोन-तीन वेळा पवार मातोश्रीवर गेले आहेत. हे काही बरोबर नसून या वयात त्यांचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते. वारंवार पवार यांना मातोश्रीवर हेलपाटे मारायला लावण्याची वेळ आणणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लक्ष केले़ 

    पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, उध्दव ठाकरे पंढरपूरसाठी बाहेर पडले तर मध्ये एकदा बांद्रा व गोरेगाव येथील तात्पुरत्या उभारलेल्या कोविड सेंटरच्या पाहण्यासाठीच गेले. या व्यतिरिक्त ते घराबाहेर निघालेले दिसत नाही. एकवेळ घराबाहेर नाही पडले तरी चालेल, पण मातोश्रीवरही ते कोणाला भेटायला तयार नाही. तसेच व्हीसीवर चर्चा केली म्हणून घरात बसून चालणार नाही़ व असेच करीत राहिला तर हे सरकार चालणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी, प्रशासनावर तुमचा धाक नसणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले.     जनतेच्या हितासाठी आम्ही सरकारबरोबर काम करायला तयार आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दररोज दोन तास जरी बरोबर घेऊन काम केले असते तर कोरोना विरोधात आणखी प्रभावी काम झाले असते. परंतु, उध्दव ठाकरे कोरोनाविरोधातील कामकाजात कोणाचाही सहभाग घेण्यास तयार नाहीत असेही पाटील म्हणाले. -----------------मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका आवश्यक सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर स्टे आला तर तो उठविणे खूप कठीण जाईल. राज्य सरकार आरक्षण टिकविण्यासाठी काही करत नाही असे आमचे म्हणणे नाही. परंतु, मराठा समाजाला यापूर्वीच मागास आयोगाने मागस म्हणून घोषित केले आहे़ तसेच ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षणाचा मुद्दाही उच्च न्यायालयात गाह्य धरला. गेल्या असल्याची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडून, राज्य सरकारने आरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका यापुढे घेतली पाहिजे. सारथी, आण्णासाहेब पाटील महामंडळ, मराठा आरक्षण या गोष्टी राजकारणाच्या वर असून, या समाजाच्या हितासाठी आम्ही राज्य सरकारबरोबर काम करण्यास तयार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.    दरम्यान, राज्य सरकारने ज्या ६०५ अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क देण्यात येत होते. ते यंदाच्या शैक्षणिक वर्षात ओबीसी तून की उच्च शिक्षण योजनेतून देणार हे जाहिर करावे़ तसेच सारथीकडून देण्यात येणारी स्कॉलरशिप व फेलोशिपही चालू करून, महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या व्यावसायिक कर्जाचे वाटप वाढवून, १० लाखांपर्यंत कर्ज बिनव्याजी अधिकाधिक तरूणांना द्यावे असेही ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊत