शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात केबीसीमध्ये ५0 कोटींवर गुंतवणूक

By admin | Updated: July 17, 2014 23:59 IST

अनेकांचे दणाणले धाबे: एजंटांना अटकेची धास्ती

बुलडाणा : सध्या राज्यभरात घोटाळ्यासाठी गाजत असलेल्या केबीसी नामक खासगी गुंतवणूक कंपनीमध्ये, बुलडाणा जिल्ह्यातील नागरीकांनी सुमारे ४0 ते ५0 कोटी रुपयाची गुंतवणुक केल्याची बाब समोर आली आहे. गुंतवणुकदारांमध्ये प्रामुख्याने डॉक्टर व शिक्षकांसह नोकरदार वर्गाचा भरणा असून, एकीकडे गुंतवणूकदार कमालीचे धास्तावलेअसताना, दुसरीकडे कंपनीच्या एजंटांनाही अटकेच्या भीतीने ग्रासले आहे.
नाशिक येथे स्थापन करण्यात आलेल्या केबीसी या खासगी गुंतवणूक कंपनीने राष्ट्रीयीकृत बँका व गुंतवणूक कंपन्याच्या तुलनेत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून, अनेकांना या व्यवसायामध्ये ओढले. सर्वसामान्य गुंतवणूकदाराला एका महिन्यात गुतंवलेल्या रकमेच्या दामदुप्पट रक्कम देण्याचे, तर एजंटांना भरघोस कमिशनचे आमिष दाखविल्यामुळे, अल्पावधीतच बुलडाणा जिल्ह्यात या कंपनीची गुंतवणूक कोट्यावधीच्या घरात गेली.
डॉक्टर, वकील व विशेषत: शिक्षक वर्गाने या कंपनीच्या योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याने सामान्य गुंतवणुकदारांचाही विश्‍वास बसला; मात्र काही काळातच कंपनीने आपला खरा रंग दाखविणे सुरू केले. बुलडाणा जिल्ह्यातील एकट्या देऊळगाव राजा तालुक्यात या कंपनीच्या योजनेत ९ ते १0 कोटी रुपयांची ग्राहकांनी गुंतवणुक झाल्याचे समजते. त्या खालोखाल बुलडाणा तालुक्यात ७ ते ८ कोटींची, तर मोताळा तालुक्यात ५ ते ७ कोटींची गुंतवणूक असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे देऊळगाव राजा तालुक्यात एका गुंतवणूकदाराची तर तब्बल एक कोटीची गुंतवणुक असल्याची जोरदार चर्चा आहे.
देऊळगाव राजा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी यांनी नागरिकांना पुर्ण चौकशी क रूनच गुंतवणूक करणे गरजेचे असल्याचे सांगुन कुणाची फसवणूक झाली असल्यास, त्याने पोलिसांकडे रितसर तक्रार दिल्यास, कारवाई करुन जनतेला न्याय मिळवून देण्यात येईल, असे सांगीतले.