शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमधील नालेसफाईची आयुक्तांकडून पाहणी

By admin | Updated: June 8, 2017 02:44 IST

मान्सूनपूर्व कामाची बुधवार, ७ जून रोजी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सिडको अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

पनवेल : खारघर शहरातील मान्सूनपूर्व कामाची बुधवार, ७ जून रोजी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सिडको अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. पावसाळा तोंडावर आला असताना नालेसफाई कितपत पूर्ण झाली आहे यासंदर्भात आयुक्तांनी स्वत: रस्त्यावर उतरून ठेकेदारांना जाब विचारात नालेसफाई करून घेतली. या वेळी खारघर शहरातील नगरसेवक त्यांच्यासोबत होते. या पाहणी दौऱ्यापूर्वी खारघरमधील नागरिकांशी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी खारघरमधील सिडको विभागीय कार्यालयात संवाद साधत यावेळी शहरात भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांबद्दल नागरिकांनी आयुक्तांसमोर गाऱ्हाणे मांडले. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शहरात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, कचऱ्याची समस्या, वाहतुकीची समस्या, अनधिकृत झोपडपट्टी आदी प्रश्न नागरिकांनी या वेळी विचारले. विशेष म्हणजे खारघर सेक्टर १० मध्ये कोपरा खाडीत सोडल्या जाणाऱ्या विनाप्रक्रि या केमिकलचा अशुद्ध पाण्याचा उग्र वास येथील रहिवाशांना सहन करावा लागत असल्याचे प्रभाग क्र मांक ६ चे नगरसेवक अ‍ॅडव्होकेट नरेश ठाकूर यांनी आयुक्तांना सांगितले. नागरिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आयुक्तांनी उत्तर देत शहरात सार्वजनिक शौचालय उभारणार असल्याचे सांगितले. यामध्ये महिलांसाठी विशेष शौचालये उभारणीचा प्रस्ताव महानगरपालिका तयार करणार आहे. दरम्यान, शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी डोअर टू डोअर कचरा कलेक्ट करण्यासंदर्भात मायक्र ो प्लॅन तयार करीत असल्याचे आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले. डस्टबीन फ्री शहर बनविणार असल्याचेही या वेळी आयुक्तांनी सांगितले. खारघर शहरातील विविध सेक्टरमधील नालेसफाईची पाहणी केली.>आयुक्तांसमोर हंडा मोर्चाशहरात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा याविरोधात महिलांनी भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणीस बिना गोगारी यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा आयुक्त डॉ. शिंदे यांच्यासमोरच सिडकोवर काढला होता. यावेळी आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना राबविल्या जातील असे आश्वासन दिले.