शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीत कामगारांना धोका

By admin | Updated: June 10, 2016 01:27 IST

लघुउद्योगामधील अपघाताच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीमुळे कामगार अडचणीत सापडला आहे.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील लघुउद्योगामधील अपघाताच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीमुळे कामगार अडचणीत सापडला आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या असुरक्षित धोरणामुळे कामगारांचा जीव धोक्यात आला आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रामकमल केमिकलमध्ये कामगाराला रासायनिक प्रक्रियेदरम्यान वाफ लागल्यामुळे कुरकुंभ येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र कंपनी व्यवस्थापनाने त्याला औषध उपचाराऐवजी घरी जाऊन आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. नंतर इतर कामगारांच्या मदतीने या कामगाराला उपचारासाठी नेण्यात आले. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील या लघुउद्योगांमध्ये अवैधरीत्या रासायनिक साठा ठेवणे, परवानगी नसणाऱ्या रसायनांवर प्रक्रिया करण्याचा प्रकारदेखील सर्रासपणे सुरू असल्याचे कामगारवर्गातून बोलले जात आहे. कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पावर कुठल्याही प्रकारचे प्रशासनिक नियंत्रण राहिलेच नाही. प्रदूषण असो किंवा अन्य सुरक्षा साधन पुरवण्यात येणारे अपयश त्यामुळे अपघाताच्या घटना या वारंवार होतच राहतात.(वार्ताहर)>रामकमल केमिकलमध्ये याआधीदेखील अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत. कंपनी व्यवस्थापन सुरक्षेच्या सुविधा पुरवण्यात चुकारपणा करीत आहे. कंपनीच्या अंतर्गत असणाऱ्या अपुऱ्या जागेत रासायनिक साठा ठेवल्यामुळे अपघात होत असतानादेखील यावर उपाययोजना झालेल्या नाहीत.