शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचेच बळी जातात म्हणून स्फोटकांच्या घटनांबाबत उदासीनता; हायकोर्टाचे व्यवस्थेवर ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 07:33 IST

संवेदनशीलता जपा, आम्हाला यापुढे अजून एकही विस्फोट नको आहे, असे हायकोर्टाने बजावून सांगितले.

नागपूर - स्फोटकांच्या कंपन्यांमध्ये सतत दुर्घटना घडत असतानाही ठोस कारवाई केली जात नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी खंत व्यक्त केली.

केवळ गरिबांचेच बळी जातात, म्हणून सरकार व प्रशासन या दुर्घटनांबाबत उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. तसेच, आम्हाला यापुढे अजून एकही विस्फोट नको आहे, असे बजावून सांगितले. यासंदर्भात कामगार नेते जम्मू आनंद यांची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली. 

चौकशी कायदेशीर कशी?एसबीएल स्फोट प्रकरणाची स्फोटक पदार्थ कायद्यातील कलम ९-१ अनुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांद्वारे चौकशी केली जात आहे. याचिकाकर्त्याचे वकील ॲड. अरविंद वाघमारे यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ही चौकशी कलम ९-ए अनुसार मुख्य स्फोटके नियंत्रक किंवा इतर सक्षम अधिकाऱ्यामार्फत व्हायला पाहिजे, असा दावा केला. न्यायालयाने केंद्र सरकारला यावर स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.

ठाेस माहिती न दिल्याने राज्य सरकारवर नाराजी कायदा व नियमांची पायमल्ली झाल्यामुळे विदर्भामध्ये गत तीन वर्षांत स्फोटकाच्या कंपन्यांमध्ये ९ दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये ५९ निष्पाप कामगारांचे बळी गेले आहेत तर, २८ कामगार गंभीर जखमी झालेत. कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी गेल्या १ मार्च रोजी विध्वंसक स्फोट झाल्यामुळे २२ महिला व ४ पुरुष कामगारांचा मृत्यू झाला आहे. सरकारने या घटनेच्या तपासाबाबत ठोस माहिती दिली नसल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. १० जूनपर्यंत तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी ३२ आरोपींविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

टॅग्स :Courtन्यायालय