शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; कंत्राटी 'कोरोना वॉरियर्स'ला मिळणार प्रोत्साहन भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 1:56 PM

कोरोना संबंधी कामकाज करणाऱ्यांना दि. १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या कालावधीतील त्यांच्या उपस्थितीनुसार भत्ता दिला जाणार

ठळक मुद्देराज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत हजारो कर्मचारी कामावर

पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार कोरोनाशी संबंधी कामकाज करणाऱ्यांना दि. १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या कालावधीतील त्यांच्या उपस्थितीनुसार हा भत्ता दिला जाणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबत हा भत्ता देण्यात येणार आहे.राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे हजारो डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदी कर्मचारी आहेत. कोरोनाचे संकट आल्यानंतर सर्वत्र हे कर्मचारी कोविड रुग्णालयांसह कोविड केअर सेंटर, सर्वेक्षण आदी कामांमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र, पुण्यासह अनेक ठिकाणी या कर्मचाऱ्यांना किमान वेतनही मिळत नाही. याबाबत प्रशासनाकडे सातत्याने मागणीही करण्यात आली आहे. पुण्यामध्ये अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याने या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक व आरोग्य सेवा आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया व प्रसुती कक्षात प्रत्यक्ष कार्यरत कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ७५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास चालु वेतनाच्या १०० टक्के तर ५० ते ७५ टक्के व २५ ते ५० टक्केपर्यंत अनुक्रमे ७५ ते ५० टक्के भत्ता मिळेल. संशयित रुग्ण किंवा निदान झालेल्या रुग्णांच्या संपर्कात असलेल्या कर्मचाऱ्यांना वरील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत २५ टक्के कमी भत्ता तर सर्वेक्षण किंवा कार्यालयाीन कामातील कर्मचाऱ्यांना त्यापेक्षा २५ टक्यांनी कमी भत्ता दिला जाईल. मात्र २५ टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असलेल्या कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जाणार नाही.----------------

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस