शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी चूक झाल्यास मंत्रिपद जाईल; वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 07:12 IST

पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबाराला दांडी मारणे आणि पक्षाच्या मंगळवारी होणाऱ्या नियोजित बैठकीस उशिरा येण्याच्या मुद्द्यावरून पवार यांनी मंत्र्यांना झापल्याचे समजते.

NCP Ajit Pawar : संवेदनशील विषयावर वादग्रस्त वक्तव्ये करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या कृषिमंत्री कोकाटेंवर अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. पवार यांनी मंगळवारी देवगिरी निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत कोकाटे यांच्यासह मंत्र्यांना "एक-दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही, तर मंत्रिपद बदलू" असा इशारा दिल्याचे समजते.

एकीकडे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांवर आरोप झाल्याने पक्षाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. त्या आरोपांतून पक्ष काहीसा सावरत असताना दुसरीकडे मंत्री कोकाटे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त विधाने केली जात असल्याने पक्ष अडचणीत येत आहे. त्यासोबतच पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबाराला दांडी मारणे आणि पक्षाच्या मंगळवारी होणाऱ्या नियोजित बैठकीस उशिरा येण्याच्या मुद्द्यावरून पवार यांनी मंत्र्यांना झापल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून 'पीकविम्याचे पैसे मिळाले की साखरपुडा, लग्न उरकता,' असे वक्तव्य केले होते.

कोकाटेनी मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवून घेतलीत्यापूर्वी अमरावती येथे पीकविमा योजनेवरून 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही,' असे वक्तव्य करून त्यांनी वाद निर्माण केला होता.शेष कार्यकारी अधिकारी निवडीबाबत वक्तव्य करून कोकोटेनी मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवून घेतली होती. त्यातच शासकीय कोट्यातील सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाल्याने कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली होती. या सर्व प्रकरणामुळे कोकाटे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षावरही टीका होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पवार यांनी कोकाटे यांना यापुढे वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणल्यास मंत्रिपद बदलण्याचा इशारा दिल्याचे समजते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस