शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या परीक्षेत शिथिलता आणण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 18:48 IST

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून विद्यापीठांना व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली.

ठळक मुद्दे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर : परीक्षांचे वेळापत्रक नव्याने तयार करणारपरीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलाव्या लागणार विद्यापीठातील व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध विषयांचे मार्गदर्शन पर व्हिडिओ केले तयार

राहुल शिंदे -  पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून विद्यापीठांना व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. तसेच विद्यापीठांच्या ३१ मार्चपर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलाव्या लागणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेत शिथिलता आणण्याचा विचार विद्यापीठातर्फे केला जात आहे. मात्र, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमासाठी क्रेडिट सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जात आहे. या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत शिथीलता देता येईल का? याबाबत विद्यापीठ स्तरावर विचार केला जात आहे.डॉ. नितीन करमळकर म्हणाले, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे येत्या 14 एप्रिलपर्यंत विद्यापीठ स्तरावरील परीक्षा घेणे शक्य नाही. परिणामी विद्यापीठाला सर्व परीक्षांचे वेळापत्रक नव्याने तयार करावे लागणार आहे. परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे आणि पुढील शैक्षणिक वषार्साठी प्रवेश देणे, याबाबतचे वेळापत्रक आता विस्कळित होणार आहे. त्यामुळे द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा घेऊन प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत रिलॅक्सेशन देता येईल का ? याबाबत विचार केला जात आहे.------------------विद्यापीठातील व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध विषयांचे मार्गदर्शन पर व्हिडिओ तयार केले आहेत. सुमारे दीड हजार व्हिडिओ विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज नाही तर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे व्हिडिओ डाऊनलोड करून घेतले आहेत. विद्यापीठाच्या प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना इतरही शैक्षणिक साहित्य पुरविले जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण येणार नाही.-डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस