शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस सावंतवर बलात्काराचा गुन्हा!

By admin | Updated: March 21, 2015 02:05 IST

अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणारा आयएएस अधिकारी मारोती हरी सावंत (५८) याच्यावर पोलिसांनी बलात्काराचाही गुन्हा दाखल केला आहे.

पुणे/ मुंबई : अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणारा आयएएस अधिकारी मारोती हरी सावंत (५८) याच्यावर पोलिसांनी बलात्काराचाही गुन्हा दाखल केला आहे. तो एका तेरा वर्षीय मुलीवर तीन वर्षांपासून बलात्कार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयाने त्याला ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याला तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे महसूल व कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत काशीद यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचा महासंचालक असलेल्या सावंत याला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याने इयत्ता दुसरीतील दोन आणि सातवीतील तीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सातवीतील तेरा वर्षांच्या मुलीवर तो तीन वर्षांपासून बलात्कार करत होता, अश्लील सीडीही दाखवीत होता. सावंत याने हिंगणे परिसरातील सासऱ्याच्या मालकीच्या सदनिकेत हा घृणास्पद प्रकार केला. मुलींनी शाळेत समुपदेशनादरम्यान या गैरप्रकाराची माहिती दिली होती.विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कोर्टासमोर सावंत याला हजर करण्यात आले. सावंतवर कलम ३७६, ३५४ (अ)(ब), ५०६, बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४, ६, ८ आणि १०, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (अ), (ब), अ‍ॅट्रासिटी कायदा कलम ३(१),(११)(१२), ३ (२)(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पीडित मुलींवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय चाचणी अहवालात स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्काराचाही गुन्हा दाखल केला.च्सावंतला शुक्रवारी दुपारी पुण्याच्या न्यायालयात आणण्यात आले होते. त्यावेळी मनसेच्या नगरसेविकांनी त्याला चपलांचा हार घातला. त्यानंतर या नगरसेविकांना अटक करून संध्याकाळी त्यांची सुटका करण्यात आली.तात्काळ निलंबनपुण्यात घडलेल्या या निंदनीय घटनेवर विधानसभेत अनेक सदस्यांंनी औचित्याच्या मुद्याद्वारे सरकारचे लक्ष वेधले. सावंत हा आयएएस अधिकारी असल्याचे या प्रकरणाचे गांभीर्य जास्त आहे. त्यामुळे सरकारने यावर त्वरीत निवेदन करावे, अशी मागणीही सदस्यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना महसूल व कृषी मंत्री खडसे यांनी सावंत यास तात्काळ निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली.