'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:05 IST2025-10-10T17:02:15+5:302025-10-10T17:05:27+5:30
Bhaiya Gaikwad Viral Video: किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला भैय्या गायकवाड या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर ही घटना घडली आहे.

'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
Bhaiya Gaikwad Kingmaker Group Video: 'हॅलो, भैय्या गायकवाड बोलतोय किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला.' असे संवाद असलेले व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर बघितलेच असतील. कॉल करून व्हिडीओ बनवणाऱ्या याच रिलस्टार भैय्या गायकवाडला समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर बेदम मारहाण करण्यात आली. एका टोल नाक्यावर त्याला तीन-चार जणांनी मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर भैय्या गायकवाडने मारहाण करणाऱ्या बदला घेणार अशी धमकीच दिली.
सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या भैय्या गायकवाडला छत्रपती संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गावर मारहाण करण्यात आली. सावंगी येथील टोल नाक्यावर त्याला तीन-चार जणांनी बेदम मारलं.
भैय्या गायकवाडला मारहाण का झाली?
झालं असं की, भैय्या गायकवाड उपोषणाला बसलेल्या मंगेश साबळेंना भेटायला गेला होता. परत येताना सावंगी टोल नाक्यावर त्याची गाडी अडवण्यात आली. गाडीला फास्ट टॅग नसल्याने गाडी थांबवली गेली. पण, भैय्या गायकवाडच्या मित्रांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरूवात केली.
भैय्या गायकवाडही कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलू लागला. त्याने त्यांना शिवीगाळही केली. त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी भैय्या गायकवाडला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Bhaiya Gaikwad Beating Video : गाडीला फास्टटॅग नसल्यानं राडा, शिवीगाळ अन् उद्धटपणे बोलला; 'किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला, भैय्या गायकवाड'ला मारहाण pic.twitter.com/VvoL9vzbtL
— Prashant Patil (@Prashant_P95) October 9, 2025
भैय्या गायकवाडची मारहाण करणाऱ्यांना धमकी
मारहाणीनंतर भैय्या गायकवाडने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात तो मारहाण करणाऱ्यांना शिव्या देत धमकी देत आहे.
भैय्या गायकवाड म्हणाला की, "जळू नका बरोबरी करा. मी सरपंच मंगेश साबळे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना भेटायला गेलो होतो. तिकडून परत येताना तुम्ही माझा पाठलाग केला. मला समृद्धी टोल नाक्यावर मारहाण केली. तुम्हाला एवढंच सांगणं आहे की, जळू नका बरोबरी करा. तुम्ही आम्हाला जेवढं मारलंय ना, तो बदला फक्त तुम्ही इकडे या नाही घेतला तर मग बोला", अशी धमकी भैय्या गायकवाडने दिली आहे.