Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > …तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत

…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत

नवे विधेयक पुढील आठवड्यात; चीन ब्राझीलला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 07:26 IST2026-01-09T07:26:12+5:302026-01-09T07:26:39+5:30

नवे विधेयक पुढील आठवड्यात; चीन ब्राझीलला मोठा फटका

otherwise america will impose 500 percent tariff on India president donald trump administration is preparing to big blow setback | …तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत

…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत

न्यूयॉर्क / वॉशिंग्टन : रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अधिक आक्रमक आर्थिक पवित्रा घेतला आहे. रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करणाऱ्या भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांवर तब्बल ५०० टक्के टॅरिफ लादण्याच्या प्रस्तावाला ट्रम्प यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम 
यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली.

हे विधेयक तयार करण्यासाठी गेले काही महिने ट्रम्प प्रशासन प्रयत्न करत आहेत. ‘सँक्शनिंग रशिया ॲक्ट, २०२५’ असे या विधेयकाचे नाव असून रशियाकडून स्वस्त दरातील तेल खरेदी करून युक्रेन युद्धाला जे अप्रत्यक्ष साहाय्य करत आहेत, अशा देशांवर दुय्यम खरेदी आणि पुनर्विक्री म्हणून ५००% टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव आहे. 

या विधेयकाला सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीच्या जवळपास सर्व सदस्यांचे अनुमोदन मिळाले आहे. हे नवे विधेयक पुढील आठवड्यात अमेरिकेच्या संसदेत मतदानासाठी मांडले जाणार आहे. या विधेयकाचा सर्व मसुदा ट्रम्प यांना मान्य असल्याचे व्हाइट हाउसचे म्हणणे आहे. हे विधेयक मंजूर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

पुतीन यांची रसद तोडणार

ग्रॅहम यांनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर सांगितले की, रशियाच्या युद्धखोर मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या देशांना लगाम घालण्यासाठी हे विधेयक अत्यंत प्रभावी ठरेल. रशियाचे तेल खरेदी करून जे देश पुतीन यांना निधी पुरवत आहेत, त्यांना आता अमेरिकेला उत्तर द्यावे लागेल. ५०० टक्के टॅरिफमुळे या देशांना रशियन तेल खरेदी करणे महागात पडेल.

सध्याची परिस्थिती काय आहे? 

- ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावले आहे, जे जगातील सर्वाधिक टॅरिफ लावलेल्या देशांपैकी एक आहे. यात रशियन तेलखरेदीमुळे लावलेल्या २५% टॅरिफचाही समावेश.

- भारत, चीन, ब्राझीलसारख्या बड्या तेल आयातदार देशांनी रशियाकडून तेलखरेदी थांबवली तरच युक्रेन युद्ध संपुष्टात येऊ शकते, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
 

Web Title : रूस से तेल खरीदने पर भारत पर 500% शुल्क लगा सकता है अमेरिका

Web Summary : रूस से तेल खरीदने पर अमेरिका भारत, चीन, ब्राजील पर 500% शुल्क लगाने पर विचार कर रहा है, जिससे यूक्रेन युद्ध को अप्रत्यक्ष मदद मिल रही है। 'सैंक्शनिंग रशिया एक्ट, 2025' का उद्देश्य पुतिन के वित्तपोषण को काटना है। सीनेट की मंजूरी की संभावना है।

Web Title : Trump Administration May Impose 500% Tariffs on India for Russian Oil

Web Summary : US considers 500% tariffs on India, China, Brazil for buying Russian oil, aiding Ukraine war indirectly. The 'Sanctioning Russia Act, 2025' aims to cut off Putin's funding. Senate approval is likely.