शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

'मी पुन्हा येईन'! व्याघ्र प्रकल्पात फिरण्याचा आनंद घेतल्यानंतर पर्यटकाचा वनविभागाला फिडबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 11:29 IST

फेसबुक, व्हॉट्सअप आणि टिकटॉकवर तरुणाई या वाक्यावर मीम्स, व्हिडीओ बनवत होती

मुंबई - सध्या सोशल मीडियावर मी पुन्हा येईन या वाक्याने धुमाकुळ घातला आहे तसा हा शब्दही लोकांसाठी विनोदाचं माध्यम बनलं आहे. अशातच आणखी एक किस्सा समोर आला आहे. यात गोंदियातील कोका अभयारण्यात पर्यटनसाठी गेलेल्या एका पर्यटकाने फिडबॅक फॉर्ममध्ये मी पुन्हा येईन असा अभिप्राय दिला आहे. हा फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मी पुन्हा येईन अशा आशयाची कविता सादर केली होती. त्यानंतर अनेक भाषणात मी पुन्हा येईन असा प्रचार केला होता. देवेंद्र फडणवीस यांचे हे वाक्य यंदाच्या निवडणुकीत सगळ्यात गाजलेले आणि प्रसिद्ध झालेले वाक्य बनलं. तरुणाईपासून अनेकांनी या वाक्याचा आधार घेत अनेक विनोदाचे किस्से आणले. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आलेल्या दिपक साखरकर या पर्यटकाने फिडबॅक फॉर्म भरुन देताना त्यात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं लिहिल्याने वनविभागात चांगलीच चर्चा रंगली. या वाक्यातून पर्यटकाला दिलेल्या सुविधा मनापासून आवडल्याचं दिसून येत असल्याचं वन कर्मचारी सांगतात.  

फेसबुक, व्हॉट्सअप आणि टिकटॉकवर तरुणाई या वाक्यावर मीम्स, व्हिडीओ बनवत होती. विरोधकांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्यावरुन भाजपाला आणि फडणवीस यांना अनेक टोले लगावले. तसेच मी पुन्हा येईन हे वाक्य इतकं प्रचलित झालं की त्यावरही गाणंदेखील तयार करण्यात आलं. 

विधानसभेच्या विशेष अधिवेशनातही देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी उपरोधिक टोला लगावला होता. फडणवीस मी परत येईन म्हटलं पण कुठं बसेन ते सांगितलं नाही असं जयंत पाटील यांनी सांगितले तर मी कधीच म्हटलो नाही की मी इथं येईन, पण यावं लागलं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. गेल्या महिनाभरापासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या नाट्यामध्ये अशाप्रसंगी राजकीय विनोदाची झालर निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर पाहायला मिळाली.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSocial Mediaसोशल मीडियाforestजंगलJayant Patilजयंत पाटीलElectionनिवडणूक