'अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला'; राजेश टोपेंनी अजितदादांच्या अपघाताच्या वेळेबाबत दिले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:07 IST2026-02-05T17:53:10+5:302026-02-05T18:07:39+5:30
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताच्या वेळेबाबत माजी मंत्री राजेश टोपे यांनी दावा केला होता. या दाव्याबाबत टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

'अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला'; राजेश टोपेंनी अजितदादांच्या अपघाताच्या वेळेबाबत दिले स्पष्टीकरण
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यात शोकाकुल वातावरण पसरले होते. दरम्यान, अपघातावरून उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. माजी मंत्री राजेश टोपे यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या वेळेबाबत एक दावा केला होता. या अपघाताची माहिती साडे सात वाजता मला मिळाल्याचे टोपे यांनी सांगितले होते. आता टोपे यांनी वेळेबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
या दुःखद घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निधनाची बातमी समजल्याच्या वेळेबाबत आपल्याकडून अनावधानाने चुकीचा उल्लेख झाल्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
"मा.अजितदादा यांचे अपघाती निधन हा आम्हा सर्वांसाठी खूप तीव्र धक्का होता. या दुःखद प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना बातमी समजल्याच्या वेळेबाबत अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला. कृपया, या कठीण व संवेदनशिल काळात ही बाब समजून घ्यावी, ही विनंती, असे टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मा.अजितदादा यांचे अपघाती निधन हा आम्हा सर्वांसाठी खूप तीव्र धक्का होता. या दुःखद प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना बातमी समजल्याच्या वेळेबाबत अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला. कृपया, या कठीण व संवेदनशिल काळात ही बाब समजून घ्यावी, ही विनंती.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 5, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, या अपघातावर अनेकांनी शंकाही व्यक्त केली असून चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे.