मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 09:27 IST2026-05-17T09:25:37+5:302026-05-17T09:27:00+5:30
मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या नात्यात काय चाललंय असाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
टीव्हीवरची 'नागीन' अभिनेत्री मौनी रॉय काही दिवसांपासून चर्चेत आहे. पती सूरज नांबियारसोबतचा तिचा संसार मोडला आहे. सुरुवातीला दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने त्यांच्यात बिनसल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली होती. नंतर मौनीने स्टोरी शेअर करत 'बातम्या पसरवू नका आणि आम्हाला प्रायव्हसी द्या' अशी विनंती केली होती. तर दुसऱ्याच दिवशी तिने थेट घटस्फोटाचीच पोस्ट जाहीर केली. दरम्यान आता मौनी आणि सूरजने पुन्हा एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो केलं आहे.
मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या नात्यात काय चाललंय असाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दोन दिवसांपूर्वी दोघांनी एकत्र पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी लिहिले की, "आम्हाला हे सांगायचं आहे की आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे आणि वैयक्तिक स्तरावर परस्पर सहमतीने आम्ही गोष्टी पुढे नेत आहोत. प्रायव्हसीसोबत आम्ही ही गोष्ट कशी हँडल करु शकतो याकडे आम्ही लक्ष देच आहोत. येत्या काळात आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनून राहण्याचा प्रयत्न करु."

मौनीच्या या पोस्टनंतर दोनच दिवसात दोघांनी परत एकमेकांना फॉलो करायला सुरुवात केली आहे. याचा अर्थ त्यांच्यात पॅचअप झालं आहे का? दोघांनी घटस्फोट मागे घेतला का? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
मौनीने २०२२ साली बिझनेसमन सूरज नांबियारसोबत लग्न केलं. दोघांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं. त्यांनी बंगाली आणि साउथ इंडियन रितींप्रमाणे लग्न केलं होतं. त्याआधी दोघं काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. लग्नानंतर ४ वर्षातच त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.