विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 08:52 IST2026-05-17T08:51:37+5:302026-05-17T08:52:38+5:30

कतरिना कैफच्या कॅप्शननेही वेधलं लक्ष

vicky kaushal birthday katrina kaif shared post with cute caption also gives glimpse of son vihaan | विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक

विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक

अभिनेता विकी कौशलने काल ३८ वा वाढदिवस साजरा केला. त्याचे वडील श्याम कौशल यांनी विकीला शुभेच्छा देत सुंदर पोस्ट शेअर केली होती. तसंच बाबा म्हणून विकीचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने अर्थात खास होता. त्याच्या वाढदिवसाला कतरिना कैफ काय पोस्ट करते याचीच चाहते वाट पाहत होते. कारण यामध्ये छोट्या विकीची म्हणजेच विहान कौशलची झलक दिसते का याची सर्वांना उत्सुकता होती. दरम्यान रात्री कतरिनाने विकीसोबतचे सुंदर फोटो पोस्ट केले. एकामध्ये विहानचा पाठमोरा फोटोही होता जो आता व्हायरल होत आहे. 

कतरिना कैफने शेअर केलेले हे फोटो एका पार्कमधले दिसत आहेत. यामध्ये दोघंही एकदम आनंदात दिसत आहे. तर आणखी एका फोटोत दोघंही छोट्या विहानकडे बघत हसत आहेत. क्युट विहान पाठमोरा बसला आहे. त्याने छानसं जॅकेट घातलं आहे. विहानचा पाठमोरा फोटो बघूनही चाहत्यांना आनंद झाला आहे. आता तो कसा दिसतो? आईसारखा की बाबांसारखा याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.

कतरिनाने या फोटोंसोबत कॅप्शन देत लिहिले, "हॅपी बर्थडे! २ वर्षांनंतर ही तीच जागा पण खूप काही बदललं आहे. प्रार्थना, संयम आणि विश्वास.. आणि आज आपण तुझा वाढदिवस आपल्या गोड मुलासोबत साजरा करत आहोत. माझं मन आनंदाने आणि कृतज्ञतेने भरुन आलं आहे. गेल्या काही वर्षांत, ९९% वेळा (बरं ठीक आहे, कदाचित ९८% वेळा) तू एखाद्या संतासारख्या संयमाने माझ्यासाठी प्रेमाचा, आशेचा आणि ताकदीचा मुख्य आधारस्तंभ राहिला आहेस. मी तुझ्यावर फक्त तू एक उत्तम आणि प्रामाणिक माणूस आहेस म्हणूनच प्रेम करत नाही, तर मी तुला विचारत असलेल्या त्या न संपणाऱ्या प्रश्नांना तू ज्या प्रकारे हसतमुखाने झेलतोस, त्यासाठीही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे... (विशेषतः अशा गोष्टींबद्दलचे प्रश्न ज्यांची उत्तरं तुलाही ठाऊक असणं शक्य नसतं!)
 
(हो, आता तू पौराणिक कथा, एआय (AI), वॉटरप्रूफिंग, मेकअप, आरोग्य, व्यवसाय आणि एकूणच आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या 'जर-तर'च्या परिस्थितींमधील तज्ज्ञ डॉक्टर/सल्लागार झाला आहेस... आणि त्या दरम्यानच्या सर्वच गोष्टींचाही!)


तुझ्या या वाढदिवशी माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की, सकाळी तू झोपेतून उठल्यापासून ते माझे प्रश्न सुरू होईपर्यंत जो मधला काळ आहे त्यात तुला स्वतःसाठी शांतपणे ब्लॅक कॉफी (किंवा दोन कॉफी) पिण्यासाठी काही सुखाचे क्षण आणि वेळ मिळावा!

कतरिनाच्या या वाढदिवसाच्या पोस्टवर प्रियंका चोप्रा, करीना कपूर, परिणीती चोप्रा अशा अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. 'तुझ्यासाठी आम्ही आनंदी आहोत , कॅट' असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच चाहत्यांनी तिच्या कॅप्शनचं कौतुक केलं आहे. विहानची झलक पाहूनही सगळे खूश झाले आहेत.

Web Title : कैटरीना ने विक्की के जन्मदिन पर बेटे की तस्वीर साझा की: माँ जैसा, पिता जैसा?

Web Summary : कैटरीना कैफ ने विक्की कौशल के जन्मदिन समारोह की तस्वीरें साझा कीं, जिसमें उनके बेटे विहान भी शामिल थे। प्रशंसक यह देखने के लिए उत्सुक हैं कि विहान कैटरीना या विक्की से मिलता-जुलता है या नहीं। हस्तियों ने कैटरीना के हार्दिक जन्मदिन संदेश की प्रशंसा करते हुए विक्की को शुभकामनाएं दीं।

Web Title : Katrina Shares Son's Photo on Vicky's Birthday: Like Mother, Like Father?

Web Summary : Katrina Kaif shared photos of Vicky Kaushal's birthday celebration, including their son, Vihan. Fans are eager to see if Vihan resembles Katrina or Vicky. Celebrities wished Vicky, praising Katrina's heartwarming birthday message.