शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

‘लाज वाटते या पुरुषांची...’

By admin | Updated: January 26, 2015 04:51 IST

मुंबईच्या उपनगरीय लोकल प्रवासातून मोठ्या प्रमाणात महिला प्रवासी प्रवास करतात. हा प्रवास मात्र गेल्या काही वर्षात महिलांना नकोसा झाला आहे

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय लोकल प्रवासातून मोठ्या प्रमाणात महिला प्रवासी प्रवास करतात. हा प्रवास मात्र गेल्या काही वर्षात महिलांना नकोसा झाला आहे. विनयभंग, अश्लिल हावभाव याविरोधात तक्रारी वाढत जात असून पाच वर्षात १४0 प्रकरणे रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) दाखल झाली आहेत. गेल्या वर्षात तरुणी,महिलांना छेडछाडीच्या ५५ घटना घडल्या असून त्यापैकी ४८ प्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. छेडछाडीच्या या वाढत्या प्रकारामुळे ‘लाज वाटते पुरुषांची’, असे म्हणण्याची वेळ महिला प्रवाशांवर आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन लाखो प्रवासी प्रवास करतात. महिलांचा प्रवास सुरक्षित आणि चांगला होण्यासाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबाही आहे. मात्र लोकल प्रवास, तसेच प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहताना किंवा पादचारी पुलावरुन जाताना विनयभंगांचा सामना महिला प्रवाशांना करावा लागतो. कधीकधी विनयभंग, छेडछाड होत असताना अन्य प्रवाशांकडून ‘त्या’महिलेला कुठलीच मदत केली जात नाही. उलट बघ्याची भूमिकाच अनेक जण घेतात. २0१0 मध्ये विनयभंगाच्या १५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. २0१४ मध्ये याच तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली असून ५५ तक्रारी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. अश्लील हावभाव करण्याच्या तर ३५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत एका वरिष्ठ रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या काही वर्षापासून महिला तक्रार करण्याची हिमंत दाखवित असलेतरी तुलनेने त्याचे प्रमाण कमी आहे, असल्या प्रकाराला आळा घालण्यासाठी त्यांनी पुढे येण्याची गरज आहे.