शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 22:40 IST

"मी जेव्हा शालेय जीवनात पाचवी-सहावीत असताना, आम्ही जेव्हा मित्र-मित्र भांडायचो, तेव्हा आम्ही एकमेकांना, सांगायचो की, "तू याच्याशी बोलायचे नाही, त्याच्याशी बोलायचे नाही." असे काही राजकारणात होईल, असे मला वाटत नाही. कारण राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे; ते अशा अटीसमोर झुकू शकते असे मला वाटत नाही."

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात का? यासंदर्भात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खरे तर, एका मुलाखतीतून सर्वप्रथम मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या विषयावर (शिवसेना-मनसे) मतभेद विसरण्यासंदर्भात भाष्य केले आणि नंतर त्याला साद देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राच्या हिताचा हवाला देत किरकोळ वाद मागे ठेवण्याचे संकेत दिले. पण याच वेळी सोबत येण्यासाठी काही अटीही घातल्या. यानंतर आता, शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. त्यांना (राज ठाकरे) झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, असे सामंत यांनी म्हटले आहे.

सामंत म्हणाले, "माझ्या माहितीप्रमाणे, राज ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ती जी मुलाखत आहे, ती दीड महिनापूर्वीची आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय घ्यायचा, हा लोकशाहीतील मुद्दा आहे. मात्र, माझे वैयक्तिक मत असे आहे की, राज ठाकरे यांचा एक वेगळा विचार आहे, त्यांचे एक वेगळे अस्तित्व आहे आणि ते एखाद्या विषयावर ठाम राहतात, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. यामुळे, त्यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही. कारण पहिल्या दिवशीच्या अटी काय होत्या? देवेंद्रजींसोबत बोलायचे नाही, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलायचे नाही, कुणाबरोबर जेवायला जायचे नाही, अमित शहा साहेबांकडे बघायचे नाही, मोदी साहेबांचा फोटो लावायचा नाही. म्हणजे, हे अगदी मी जेव्हा शालेय जीवनात पाचवी-सहावीत असताना, आम्ही जेव्हा मित्र-मित्र भांडायचो, तेव्हा आम्ही एकमेकांना, सांगायचो की, "तू याच्याशी बोलायचे नाही, त्याच्याशी बोलायचे नाही." असे काही राजकारणात होईल, असे मला वाटत नाही. कारण राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे; ते अशा अटीसमोर झुकू शकते असे मला वाटत नाही." सामंत एबीपी माझासोबत बोलत होते.याचवेळी, "कालची जी काही मुलाखत आहे, त्यावरून जे राजकीय रणकंदन निर्माण झाले आहे, त्यात मी शिवसेनेची भूमिका सांगितलेली नाही. मी माझी वैयक्तिक भूमिका सांगितली. जे मी राज साहेबांना ओळखतो किंवा त्यांच्याबद्दल वाचलंय अथवा त्यांच्या बद्दल ऐकलंय. कुठल्याही अटी-शर्तीला अधीन राहून राज साहेब स्वतःला झुकवतील, असे मला वाटत नाही," असेही उदय सामंत म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेUday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाMNSमनसे