पाकिस्तान नव्हे मी तर शांततेचा एजंट - सुधींद्र कुलकर्णी

By Admin | Updated: October 13, 2015 12:49 IST2015-10-13T12:49:38+5:302015-10-13T12:49:58+5:30

मी पाकिस्तानचा एजंट नसून मी शांततेचा एजंट आहे असे प्रत्युत्तर सुधींद्र कुलकर्णी यांनी शिवसेनेला दिले आहे.

I am a peace agent, not a Pakistan - Sudheendra Kulkarni | पाकिस्तान नव्हे मी तर शांततेचा एजंट - सुधींद्र कुलकर्णी

पाकिस्तान नव्हे मी तर शांततेचा एजंट - सुधींद्र कुलकर्णी

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १३ - मी पाकिस्तानचा एजंट नसून मी शांततेचा एजंट आहे असे प्रत्युत्तर सुधींद्र कुलकर्णी यांनी शिवसेनेला दिले आहे.  मी शिवसेना व सामनाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा आदर करतो पण त्यांनीदेखील दुस-यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा आदर केला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. 

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी सोमवारी सकाळी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकली होती. तर मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून सुधींद्र कुलकर्णी यांचा उल्लेख पाकिस्तानी एजंट म्हणून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी सुधींद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे असे कुलकर्णी यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील जनतेमध्ये संवाद घडला तरच संबंध सुधारतील आणि यासाठीच आमचे प्रयत्न सुरु आहे असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच दक्षिण आशियातील देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. 

Web Title: I am a peace agent, not a Pakistan - Sudheendra Kulkarni