शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सहकारी बँकप्रकरणी मला थेट जबाबदार धरलेले नाही : अजित पवार

By admin | Updated: May 31, 2014 22:14 IST

कलम ८३ अन्वये सादर केलेल अहवालात आपल्याला थेटपणे जबाबदार धरलेले नाही असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदनाव्दारे केला आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या तोटयासंदर्भातील चौकशी अधिकार्‍यांनी सहकार कायद्याच्या कलम ८३ अन्वये सादर केलेल अहवालात आपल्याला थेटपणे जबाबदार धरलेले नाही असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदनाव्दारे केला आहे. याप्रकरणात शिवसेना, भाजप, शेकाप, मनसेसह सर्वपक्षीय संचालकांची नावे घेतली जात असली तरी अद्याप जबाबदारी निि›त झालेली नाही. कलम ८८ अन्वये चौकशी पूर्ण झाल्यानंतर जबाबदारी निि›त करण्यात येईल, त्यानंतर संबंधितांविरूध्द नियमानुसार योग्य कारवाई होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.राज्य सहकारी बँकेच्या तोटयाला तत्कालिन संचालक मंडळ जबाबदार असल्याचा निष्कर्ष चौकशी अधिकार्‍यांनी काढला आहे. परंतु त्या अहवालामध्ये जबाबदारी निि›त केलेली नाही, त्यामुळे अकारण सगळयांकडे संशयाने पाहिले जात आहे, त्यामुळे लवकरच जबाबदारी निि›त केली जावी अशी आपली भुमिका असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.तोटयाची जबाबदारी निि›त करण्यासाठी कलम ८८ अन्वये अर्धन्यायीक स्वरूपाची चौकशी सुरू करण्यात आली असून या चौकशीचा अहवाल आल्यानंतरच बँकेच्या तोटयास जबाबदार कोण हे स्पष्ट होईल. राज्य शासन देखील याप्रकरणातील खर्‍या दोषींचा शोध घेण्यासाठी आग्रही असून त्यासाठीच कलम ८३ आणि कलम ८८ अन्वये बँकेच्या व्यवहारांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य बँकेसंदर्भातील काही प्रकरणांची सुनावणी उच्च न्यायालयातही सुरू असल्याने त्यासंदर्भात अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही, परंतु चौकशी अद्याप पूर्ण झाली नसताना, तोटयाची जबाबदारी निि›त केली नसताना कुणालाही दोषी समजून त्याच्यावर आरोप करणे योग्य ठरणार नाही, असे पवार यांनी पाठविलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे.