शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

By admin | Updated: October 10, 2016 20:02 IST

दोघांच्या प्रेमाच्या आड येणा-या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने गळा आवळून खून केल्याची घटना अंढेरा येथे १० आॅक्टोबर रोजी उघडकीस आली.

ऑनलाइन लोकमत
अंढेरा (बुलडाणा), दि. 10 -  दोघांच्या प्रेमाच्या आड येणा-या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने गळा आवळून खून केल्याची घटना अंढेरा येथे  १० आॅक्टोबर रोजी उघडकीस आली. पोलिसांनी पत्नी व प्रियकराला अटक केली असून, हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
अंढेरा येथील गणेश किसन ढाकने (वय ४०) हे पत्नी अर्चना गणेश ढाकने (वय २५) हिच्यासोबतच वास्तव्यास होते. दरम्यान ९ आॅक्टोबरच्या रात्री अर्चना व तिचा प्रियकर विष्णू नामदेव ढाकने (वय २२) या दोघांनी गणेश ढाकने याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तसेच पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे दाखविण्यासाठी त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला. १०
आॅक्टोबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृतक गणेशचे वडिल किसन पाटीलबा ढाकने (६५ वर्षे) यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून तपासनी केली. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर गणेशची गळा आवळून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गणेशची पत्नी अर्चना व विष्णू ढाकने यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर अर्चनाने गणेश त्यांच्या प्रेमात अडसर ठरत असल्याने त्याची हत्या केल्याची कबूली दिली. अर्चना व विष्णू ढाकनेवर ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.