शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

घरांच्या विक्रीत होणार ३० टक्के विक्रमी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 07:11 IST

बांधकाम व्यवसायाचा तोटा एक लाख कोटी! : २५० संलग्न व्यवसायांनाही घरघर लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घरांच्या किमती कमी होतील. गृहकर्जही स्वस्त दराने मिळू लागेल. मात्र, त्यानंतरही घरांच्या विक्रीत वाढ होणार नाही. किंबहुना येत्या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांची विक्री तब्बल ३० टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतीपाठोपाठ सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या बांधकाम व्यवसायासह त्याच्याशी संलग्न असलेले २५० उद्योगधंदे आणि व्यवसाय कोरोनाच्या प्रकोपामुळे अडचणीत आले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत या सर्व व्यवसायांचा एकूण तोटा तब्बल एक लाख कोटी रुपये असेल.

केपीएमजी या प्रख्यात सल्लागार संस्थेने देशातील गृहनिर्माण, व्यावसायिक बांधकामे, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांवरील कोरोना प्रभावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात ही निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. २०१९-२० या आर्थिक वर्षांत देशांत ४ लाख घरांची विक्री झाली होती. यंदाच्या आर्थिक वर्षांत त्यात तब्बल १ लाख २० हजारांची घट होईल आणि २ लाख ८० हजारांपर्यंतच्या घरांचीच विक्री होऊ शकेल, असा अंदाज आहे. २०१० ते २०१३ या तीन आर्थिक वर्षांत सरासरी ४ लाख ४७ हजार घरांची विक्री झाली होती. तो आजवरच्या घरांच्या खरेदी-विक्रीचा उच्चांक होता. त्या तुलनेत घरांच्या विक्रीत आता लक्षणीय घट होणार आहे. त्यामुळे स्टीलपासून ते रंगापर्यंत आणि सिमेंटपासून ते दरवाजे-खिडक्या निर्मिती करणाऱ्यांपर्यंतच्या तब्बल २५० उद्योगांवर परिणाम होणार आहे.

६ ते १२ महिन्यांच्या कालावधीनंतर सुरक्षित निवाºयाची गरज पूर्ण करण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे घरांच्या खरेदी-विक्रीला थोडीफार चालना मिळू शकेल, असा आशावाद या अहवालात नमूद केला आहे. तसेच, घर खरेदी-विक्रीच्या पद्धतीमध्ये विकासकांना नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करावा लागेल, असे असेही त्यात नमूद आहे.

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांचा खोळंबासध्या मध्यमवर्गीयांना नोकरी गमावण्याची आणि वेतन कपातीची भीती आहे. त्यामुळे परवडणाºया घरांच्या विक्रीत घट होईल, असे केपीएमजीचे मत आहे. बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाची पुरवठा साखळी तुटल्यामुळे प्रकल्पांच्या खर्चात वाढ होईल. विकासकांच्या फायद्याचे गणितही विस्कळीत होईल. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतील करारांना अंतिम स्वरूप देणे, त्यांच्यासाठी संक्रमण शिबिरांची उभारणी करणे आदी कामांमध्ये अडथळे निर्माण होतील. त्यामुळे त्या कामांचाही खोळंबा होईल, असे मत या अहवालात नोंदविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReal Estateबांधकाम उद्योग