शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 14:14 IST

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असून, याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, मी ठणठणीत आहे. पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहितीही त्यांनी या ट्विटमधून दिली आहे.

ठळक मुद्देउच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत कोरोना पॉझिटिव्हमी ठणठणीत असून, पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रूजू होणार

रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीउदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असून, याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, मी ठणठणीत आहे. पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहितीही त्यांनी या ट्विटमधून दिली आहे.गेले काही दिवस मंत्रीउदय सामंत शासकीय कार्यक्रमांपासून दूर आहेत. रत्नागिरीतील प्रशासकीय कामांचा आढावाही ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेचा आढावा घेतला. तसेच त्यांनी दोन्ही जिल्ह्यात मोहिमेचे काम इतर जिल्ह्यांप्रमाणे चांगले असल्याचेही सांगितले होते.

 

गेले काही दिवस शासकीय कार्यक्रमांपासून अलिप्त राहणाऱ्या उदय सामंत यांनी मंगळवारी ट्विट करून आपला कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेले दहा दिवस मी स्वत: क्वारंटाईन आहे. त्यामुळे मी स्वत: कोरोना चाचणी करून घेतली असून, तो पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले दहा दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्याने संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांना काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

तसेच मी ठणठणीत असून, पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रूजू होणार असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. सध्या उदय सामंत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपले कामकाज करत आहेत. तसेच त्यांनी मी विलगीकरण कक्षात असल्याने शिवसेना संपर्क कार्यालय शिवालय येथे ३० सप्टेंबर रोजी होणारा जनता दरबार होणार नसल्याची माहितीही सामंत यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतministerमंत्रीRatnagiriरत्नागिरी