शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालये सामान्यांच्या दारात उभा असलेला प्राथमिक पहारेकरी, मुंबई उच्च न्यायालयातील सत्कार समारंभात सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 07:45 IST

Chief Justice Suryakant News: उच्च न्यायालये सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याची केवळ पायरी नाहीत, सामान्य नागरिकांच्या दारात उभा असलेला प्राथमिक पहारेकरी म्हणजे उच्च न्यायालये आहेत, असे प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केले.

मुंबई - उच्च न्यायालये सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याची केवळ पायरी नाहीत, सामान्य नागरिकांच्या दारात उभा असलेला प्राथमिक पहारेकरी म्हणजे उच्च न्यायालये आहेत, असे प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम शब्द असू शकतो, पण अनेकदा सर्वात महत्त्वाचा शब्द उच्च न्यायालयाचाच असतो, अशी टिप्पणीही त्यांनी केली. मुंबई उच्च न्यायालयात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

कायदा मौन असताना पहारेकरी गप्प बसत नाही. पर्यावरणाचे संरक्षण, कैद्यांसह प्रत्येक मानवाचा सन्मान जपणे, तसेच राष्ट्रीय संकटाच्या काळात स्थलांतरित कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्देशांचे आपण साक्षीदार आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश आणि वकील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उशिरा मिळणारा न्याय म्हणजे न्यायाचा नाश
कायद्याच्या अपयशाबाबत उच्च न्यायालयांनी अधिक सक्रिय व सजग राहावे. उशिरा मिळणारा न्याय म्हणजे केवळ न्याय नाकारणे नव्हे, तर न्यायाचा नाश होय, असे ठाम मत सरन्यायाधीशांनी ज्येष्ठ विधीज्ञ फली नरिमन स्मृती व्याख्यानादरम्यान मांडले. तसेच मध्यस्थी व सलोखा यासारख्या यंत्रणांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

दोषसिद्धी दर वाढवू : उपमुख्यमंत्री शिंदे
राज्याचा दोषसिद्धी दर ९ वरून ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी कोल्हापूरच्या बहुप्रतिक्षित सर्किट बेंचला पूर्ण बेंचचा दर्जा देण्याची विनंती शिंदे यांनी सरन्यायाधीशांकडे केली.

मुंबई उच्च न्यायालय ही संस्कृती
मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रांगणात वेळ घालवलेल्या प्रत्येकासाठी मुंबई उच्च न्यायालय एक संस्कृती आहे. जिथे वकिली तीक्ष्ण असते, पण शिस्तबद्ध; जिथे मतभेद असले तरी ते अवमानात परिवर्तित होत नाहीत, असे गौरवद्गार सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावेळी काढले.

English
हिंदी सारांश
Web Title : High Courts: First line of defense for citizens, says CJI Suryakant.

Web Summary : Chief Justice Suryakant emphasizes High Courts as primary protectors of citizens' rights. He highlighted their role in environmental protection, human rights, and migrant worker welfare. He urged proactive action against delayed justice. The state aims to raise the conviction rate, said Deputy CM Shinde.
टॅग्स :Courtन्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट