शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा

By admin | Updated: January 26, 2015 01:02 IST

माजी सॉलिसिटर जनरल वरिष्ठ वकील हरीश साळवे यांना मानाचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे. अ‍ॅड. हरीश साळवे नागपूरचे सुपुत्र असून त्यांचे शालेय शिक्षण

हरीश साळवे यांना पद्मभूषण : सर्वत्र कौतुकनागपूर : माजी सॉलिसिटर जनरल वरिष्ठ वकील हरीश साळवे यांना मानाचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे. अ‍ॅड. हरीश साळवे नागपूरचे सुपुत्र असून त्यांचे शालेय शिक्षण एसएफएस शाळेत झाले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते एन. के. पी. साळवे त्यांचे वडील होय. आई अम्ब्रिती या व्यवसायाने डॉक्टर होत्या. सदर येथे त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. साळवे यांनी सुरुवातीला ‘सी. ए.’चे शिक्षण घेतले होते. यानंतर ते वकिलीकडे वळले. कर विषयक कायद्यांचे प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला त्यांचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी १९८० मध्ये वकिली व्यवसायाला सुरुवात केली. यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. ते प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले आहे. ते १ नोव्हेंबर १९९९ ते ३ नोव्हेंबर २००२ पर्यंत देशाचे सॉलिसिटर जनरल होते. त्यांनी माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबत कार्य केले आहे. त्यांनी रिलायन्स, टाटा, व्होडाफोन आदी नामांकित उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व केले आहे. हरीश साळवे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यामुळे शहरातील वकिलांनी आनंद व्यक्त केला. ज्येष्ठ वकील जुगलकिशोर गिल्डा यांनी हा नागपूरचा सन्मान असल्याचे सांगितले. पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड करून शासनाने त्यांचा योग्य सन्मान केला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)