शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ मृतदेह रुद्रगौडाचा नाही

By admin | Updated: October 30, 2015 01:18 IST

खानापूरजवळील माणिकवाडी (ता. जि. बेळगाव) जंगलात सापडलेला अनोळखी मृतदेह व रुद्रगौडा पाटील याच्या चेहऱ्यात काही प्रमाणात साम्य असले, तरी तो मृतदेह रुद्रगौडाचा नाही

जयवंत आदाटे, जत (जि.सांगली) :खानापूरजवळील माणिकवाडी (ता. जि. बेळगाव) जंगलात सापडलेला अनोळखी मृतदेह व रुद्रगौडा पाटील याच्या चेहऱ्यात काही प्रमाणात साम्य असले, तरी तो मृतदेह रुद्रगौडाचा नाही, असे ठाम मत रुद्रगौडाचे काका व काराजनगी (ता. जत) येथील गावकामगार पोलीस-पाटील चनगोंडा आप्पासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी (कर्नाटक) यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकऱ्यांच्या रेखाचित्राशी साम्य असणारा एक मृतदेह माणिकवाडी (जि. बेळगाव) येथील जंगलात सापडला आहे. या संदर्भातील माहिती बुधवारी प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर खळबळ उडाली.रुद्रगौडाचे चुलत भाऊ शिवानंद पाटील म्हणाले की, ‘तो अनोळखी मृतदेह रुद्रचा नाही. वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून आम्हाला माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या संदर्भात आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.’ ‘मृतदेह रुद्रगौडाचा आहे किंवा नाही, हे सिद्ध करण्यासाठी आमची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे, असे आम्हाला वर्तमानपत्रांतून समजले. प्रत्यक्षात या संदर्भात पोलिसांकडून कोणतीही सूचना देण्यात आली नाही,’ असे रुद्रगौडाच्या आई-वडिलांनी सांगितले.