शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

फाशीची आदेशच बेकायदा - याकूब मेमनची सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका

By admin | Updated: July 23, 2015 16:54 IST

टाडा कोर्टाने दिलेला फाशीची शिक्षा देण्याचा आदेश बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करत याकूब मेमनने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - टाडा कोर्टाने दिलेली फाशीची शिक्षा देण्याचा आदेश बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करत याकूब मेमनने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी स्फोटातील दोषी आढळलेल्या याकूब मेमनच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर त्याला ३० जुलै रोजी फाशी देण्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, याआधी दाखल केलेली पुनर्विचार याचिका ही याकूबने न करता त्याच्या भावाने केली होती. त्यामुळे याकूब मेमनला स्वत:ला आणखी एकदा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे करण्याचा घटनादत्त अधिकार असून, या अधिकाराची अमलबजावणी होण्याची गरज असतानाही ती झाली नसल्याने कोर्टाने दिलेला फाशीचा आदेश बेकायदेशीर ठरत असल्याचा व हा कायदेशीर प्रक्रिया पार न पाडल्याचा दोष असल्याचे याकबच्या वतीने सुप्रीम कोर्टात सांगण्यात आले आहे. यामुळे याकूबची फाशी काही दिवस तरी टळेल असे दिसत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याकूबची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर त्याने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दयेचा अर्ज केला असल्याने त्याची फाशी आणखी काही दिवसांसाठी टळली आहे.
मंगळवार, २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयने याकूबची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली, त्यामुळे टाडा कोर्टाने दिलेल्या त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानुसार याकूबला ३० जुलै रोजी फासावर लटकवण्यात येणार होते. मात्र आता याकूबने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दयेचा अर्ज केला आहे. या अर्जावर महाराष्ट्र सरकार व त्यानंतर राष्ट्रपती काय भूमिका घेतात यावर याकूबचे भवितव्य अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राष्ट्रपतींनी पुन्हा फाशीवर शिक्कामोर्तब केले तरी एकंदर प्रक्रियेस लागणारा कालावधी लक्षात घेता ही शिक्षा किमानपक्षी पुढे जाईल असे दिसत आहे.