शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ज्ञानगंगा' कार्यक्रम; सह्याद्री वाहिनीवर सोमवारपासून प्रसारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 00:57 IST

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे गिरवता येणार

ठळक मुद्देदररोज सकाळी ७.३० सात ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ज्ञानगंगा कार्यक्रम प्रसारित केला जाणार

पुणे : इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे येत्या सोमवारपासून (दि.२६) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण केले जाणार आहे.पहिल्या सत्राच्या शेवटच्या आठवड्यात शैक्षणिक कार्यक्रम सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नव्हते. परिणामी शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे सोमवारपासून दररोज सकाळी ७.३० सात ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ज्ञानगंगा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे गिरवता येणार आहेत. 

 शिक्षक १५ जूनपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करत असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या ठिकाणी शिक्षक प्रत्यक्ष गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा येत असल्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एमकेसीएल आणि राज्य परिषदेच्या सहकार्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. परंतु, नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणताही शैक्षणिक कार्यक्रम नव्हता. परिणामी आपल्यासाठी अभ्यासक्रम कधी सुरु होणार याकडे पालक व विद्यार्थ्यांचे लागले होते. त्यामुळे आता शैक्षणिक कार्यक्रमाची प्रतीक्षा संपणार आहे. ज्ञानगंगा कार्यक्रम सुरू करण्याबाबतची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवरुन दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळा