वृद्धेची विवस्त्र करून झाडाझडती

By Admin | Updated: July 28, 2014 04:16 IST2014-07-28T04:16:31+5:302014-07-28T04:16:31+5:30

प्रथम वर्गाच्या डब्यातून चुकून प्रवास केल्याने महिला टीसीने वृद्ध महिलेला विवस्त्र करून झाडाझडती घेतल्याची घटना मीरा रोड स्थानकात घडली

Grate the old woman and bark | वृद्धेची विवस्त्र करून झाडाझडती

वृद्धेची विवस्त्र करून झाडाझडती

मुंबई : प्रथम वर्गाच्या डब्यातून चुकून प्रवास केल्याने महिला टीसीने वृद्ध महिलेला विवस्त्र करून झाडाझडती घेतल्याची घटना मीरा रोड स्थानकात घडली. २२ जुलै रोजी घडलेल्या घटनेनंतर उशिराने जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने दोन महिला टीसींना निलंबित केले आहे.
६५ वर्षीय पीडिता या अंधेरीहून जलद लोकलने विरारला येत होत्या. द्वितीय श्रेणीचे तिकीट काढल्यानंतर त्या चुकून प्रथम श्रेणीच्या डब्यात चढल्या. मीरा रोड स्थानकात लोकल आली असता एका टीसी महिलेने त्यांना तिकीट विचारले असता, ते द्वितीय श्रेणीचे होते. त्यामुळे टीसीने त्यांना लोकलमधून उतरवून टीसींच्या एका रूममध्ये नेले आणि त्यांच्याकडे २५० रुपये दंड मागण्यास सुरुवात केली. मात्र आपल्याजवळ एवढे पैसे नसल्याचे सांगताच या महिला टीसीने आणि तिच्या आणखी एका सहकारी टीसीने त्यांना दमदाटी करीत विवस्त्र करून झाडाझडती घेतली.
यानंतरही त्यांना एक तास रूममध्ये डांबून ठेवण्यात आले. याविरोधात त्या पीडितेच्या मुलीने ग्रँट रोड स्थानकातील टीसींच्या मुख्य कार्यालयात तक्रार केली, तरीही त्या टीसींविरोधात कारवाई केली जात नव्हती. (प्रतिनिधी)

Web Title: Grate the old woman and bark