शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी ५० वर ग्रामपंचायतींचे ठराव

By admin | Updated: February 1, 2015 00:54 IST

यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी दिग्रस तालुक्यातील पन्नासावर ग्रामपंचायतींनी

जागरण जनमंचचा पुढाकार : केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिग्रस (यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी दिग्रस तालुक्यातील पन्नासावर ग्रामपंचायतींनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत ठराव घेतला. जागरण जनमंचच्या पुढाकारात विविध संघटनांच्यावतीने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी लोकमत मीडिया प्रा.लि. चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी सुरूवातीपासून पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच प्रयत्नांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली. यवतमाळ येथे तत्कालिन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर या रेल्वे मार्गाला रेल्वेच्या अर्थसंकल्पात अत्यल्प निधी मिळाला.खा. विजय दर्डा निधीसाठी नेहमी आग्रही असतात. त्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आता दिग्रस तालुक्यातील जनताही त्यांच्या सोबतीला आली आहे. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींनी ठराव करून आगामी रेल्वे अर्थसंकल्पात मोठी तरतूद या प्रकल्पासाठी करावी, अशी मागणी केली आहे. यासाठी जागरण जनमंचने पुढाकार घेतला असून, सर्वपक्षीय नेत्यांसह तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने एक निवेदन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना तहसीलदार नितीन देवरे यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले.या निवेदनावर सुधीर देशमुख, सुभाष अटल, सुरेंद्र मिश्रा, नवीन गड्डा, प्रा. विठ्ठल काटेवाले, महादेव सुपारे, दीपक वानखेडे, राज चव्हाण, रवींद्र अरगडे, अरविंद मिश्रा, संजीव चोपडे, मंगेश दुद्दलवार, नीरज दुद्दलवार, रामदास पद्मावार, अतीश शिंदे, रमाकांत काळे, रामभाऊ मारशेटवार, केतन रत्नपारखी, पवन गावंडे, अभय इंगळे, मजहर खान, कमलेश आडे, लालसिंग राठोड, उद्धव अंभुरे, प्रफुल्ल व्यवहारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)या ग्रामपंचायतींनी केला ठरावप्रजासत्ताक दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत तालुक्यातील साखरा, सावंगा खुर्द, तिवरी, खंडापूर, चिंचोली क्र. १, निंभा, सेवानगर, इसापूर, रामनगर, राहटी, झिरपूरवाडी, शिवणी, फेट्री, रुई तलाव, महागाव, साखरी, काटी, मरसूळ, रुई मोठी, लाख रायाजी, हरसूल, बेलोरा, आरंभी, वसंतनगर, कांदळी, डेहणी, धानोरा खु., माळहिवरा, डोळंबा, आमला बु., चिरकुटा, विठोली, वाई मेंढी, लिंगीवाई, वाई, खेकडी, मोख, चिचपातर, मांडवा, कळसा, धानोरा बु., सावंगा बु., देऊरवाडा, विठाळा, तुपटाकळी येथील ग्रामपंचायतींनी रेल्वेमार्ग तत्काळ पूर्ण करण्यासाठी ठराव घेतला आहे.