शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदांनी ‘थर’ गाठलाच!

By admin | Updated: September 7, 2015 02:17 IST

‘गोविंदा रे गोपाळा’चा जल्लोष करत शहर-उपनगरातील गोविंदा पथकांनी सररास सात, आठ आणि ठाण्यात नऊ थर रचून न्यायालयाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवले.

मुंबई : ‘गोविंदा रे गोपाळा’चा जल्लोष करत शहर-उपनगरातील गोविंदा पथकांनी सररास सात, आठ आणि ठाण्यात नऊ थर रचून न्यायालयाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवले. ‘एक्क्या’साठी सररासपणे बालगोविंदांचा सहभाग दिसून आला. आयोजकांनीही न्यायालयाच्या निर्बंधांकडे कानाडोळा करत सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली नसल्याचे दिसून आले. उत्साहाच्या भरात मात्र मुंबई व उपनगरांमध्ये शंभराहून अधिक गोविंदा जखमी झाले आणि भिवंडी येथे एका गोविंदाचा मृत्यू झाला. दुष्काळी परिस्थिती आणि हायकोर्टाने घातलेल्या निर्बंधांमुळे मुंबई आणि ठाण्यातील अनेक प्रतिष्ठित दहीहंड्या रद्द झाल्या होत्या. त्यामुळे शहर-उपनगरातील नामांकित गोविंदा पथकांनी गल्लीबोळांतील आयोजनांना प्राधान्य दिले. शहर-उपनगरातील काही आयोजनांच्या ठिकाणी न्यायालयाचे नियम सररास धाब्यावर बसवून २० फुटांपेक्षा जास्त उंचीचे थर लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण दिवसभर ट्रकमध्ये खचाखच बसलेले गोविंदा आणि दुचाकी वाहनांचे मोठमोठे थवे शहरात फिरताना दिसून आले.एका गोविंदाचा मृत्यू; १२९ जखमी दहीहंडी बांधताना भिवंडीत अंबाडीजवळील दिघाशी येथे गणेश पाटील या गोविंदाचा मृत्यू झाला. उत्सव साजरा करताना सुरक्षेची काळजी घेऊ, असे आश्वासन मंडळ आणि आयोजकांनी दिले असतानाही दिवसभरात १२९ गोविंदा जखमी झाले; याशिवाय ठाण्यात १०पेक्षा अधिक गोविंदा जखमी झाले. दादरच्या आयडियल परिसरातील हंडी ठिकाणी जय हनुमान गोविंदा पथकाने आठ थर रचले तर साई दत्त मित्र मंडळाच्या महिला पथकाने ही हंडी फोडली. आठ थर लावल्याने आयडियलचे आयोजक वादात सापडले आहेत. यासंदर्भात दहीहंडीविरोधात न्यायालयात याचिका करणाऱ्या स्वाती पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. दहीहंडी उत्सवात बोलबाला असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आयोजकांनी माघार घेतल्याने शहर-उपनगरांत केवळ सेना भाजपाच्या हंड्यांचा ‘आवाज’ ऐकू आला. मात्र आयोजनांमध्ये न्यायालयाचे निर्बंध सरसकट मोडण्यात आले. त्यामुळे सत्तेत असलेले सेना-भाजपा त्यांच्याशी संबंधित आयोजकांवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.कोर्टाचे निर्बंध आणि मोठ्या आयोजकांच्या माघारीनंतरही गोविंदांचा उत्साह मात्र कमी झालेला नव्हता.