शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची शपथ 'राजशिष्टाचारा'ला धरून नाही; राज्यपालांनीच दाखवल्या दोन चुका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 11:30 AM

मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अन् गगनभेदी घोषणांमध्ये शिवसैनिकांचा आवाज घुमला.

मुंबई-  मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अन् गगनभेदी घोषणांमध्ये शिवसैनिकांचा आवाज घुमला. हा शपथविधी समारंभ अनेकांनी याचि देही याचि डोळा पाहिला. परंतु या शपथ ग्रहण समारंभादरम्यान भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी शपथ घेण्यापूर्वीच काही नेत्यांची नावं घेतली होती, राज्यपालांच्या मते हे शपथ ग्रहण समारंभाच्या प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे. तसेच या शपथ ग्रहण समारंभात सरकारी यंत्रणेला सहभागी करून न घेतल्यानंही राज्यपाल नाराज आहेत. उद्धव ठाकरेंच्या शपथ ग्रहण समारंभादरम्यान मंचावरची व्यवस्था योग्य नव्हती. शपथ ग्रहण समारंभादरम्यान प्रशासनाला मंचावरची व्यवस्था करू दिली नाही. त्यामुळे ही त्यात बऱ्याच त्रुटी होत्या, असंही ते म्हणाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे यासंदर्भात नाराजीही व्यक्त केली आहे. शपथविधीदरम्यान नेत्यांची नावं घेण्यात आल्यानं राज्यपाल नाराज आहेत.  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखोंच्या साक्षीने गुरुवारी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपस्थित जनसागराला साष्टांग दंडवत घालत उद्धव ठाकरे यांनी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. उद्धव असे नतमस्तक होताना लाखोंची गर्दी त्यांच्या या विनम्रभावाने हेलावून गेली. महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे दिग्गज नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ते कृतज्ञतापूर्वक भेटले, तेव्हाही टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, जयंत पाटील आणि छगन भुजबळांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस