शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचंं नव्हे, मुंबईतलं सरकार हवं !

By admin | Updated: October 10, 2014 22:50 IST

कुडाळ : शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारसभेत अजित पवारांचा ‘कॉँग्रेस-भाजप’वर निशाणा

कुडाळ : ‘जनतेने मोठ्या विश्वासाने भाजपला सत्ता दिली. तरीही त्यांना महागाई कमी झाली नाही. कांदा आणि उसाला चांगला भाव त्यांना देता आलेला नाही. मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मारक आहे. काँॅग्रेस आणि भाजपवाले दिल्लीत बसून महाराष्ट्राचे निर्णय घेतात. आम्ही मात्र, सातारा अथवा मुंबईमध्येच बसून राज्याचे निर्णय घेतो. म्हणूनच राज्यात मुंबईचं सरकार आणा,’ असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ‘सातारा-जावळी’ चे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कुडाळ येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. कुडाळ येथील सभेस शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, शिक्षण सभापती अमित कदम, पंचायत समिती सभापती सुहास गिरी, वसंत मानकुमरे व सुनेत्रा शिंदे आदी उपस्थित होते.पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेत अजित पवार म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी चुकीच्या माहितीवर काही तरी बोलत आहेत. बारामतीमध्ये पाणी नसते तर लोकांनी आम्हाला निवडून दिले असते का? महाराष्ट्र नेहमीच गुजरातपेक्षा पुढे राहिला आहे. देशातील पहिली मोनोरेल महाराष्ट्राने सुरू केली आहे. एवढे असतानादेखील भाजप मात्र ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरातबाजी करून महाराष्ट्राची बदनामी करत आहे. आता आम्ही महाराष्ट्राची अशाप्रकारे सुरू असलेली बदनामी कधीच सहन करणार नाही. भाजपवाले आणि नरेंद्र मोदीच शेतकऱ्यांसाठी मारक आहेत.’अजित पवार यांनी भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘चीनची घुसखोरी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात येथे चीन अध्यक्षांसोबत झोपाळ्यावर बसून अगदी झुलत चहा पीत होते. आता तर भारतीय सीमारेषेवर पाकिस्तानचे हल्ले सुरू असताना मोदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मग्न आहेत. त्यामुळे आता देशातील १२५ कोटी जनतेने कोणाच्या विश्वासावर सुरक्षित राहायचे,’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.‘जिल्हा परिषद निवडणुकीत अपघाताने निवडून आलेल्या संधीसाधूंना तालुक्यातील जनता त्यांची जागा दाखवून देतील,’ अशी टीका शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. शशिकांत शिंदे यांनीही भाषण केले. यावेळी उपसभापती निर्मला कासुर्डे, पंचायत समिती सदस्य मोहन शिंदे, रूपाली वारागडे, जितेंद्र शिंदे, सौरभ शिंदे, मालोजी शिंदे, संगीता चव्हाण, सारिका सकपाळ, कविता धनावडे, जयदीप शिंदे, कांचन साळुंखे, चंद्रकांत जाधव, प्रवीण देशमाने, वसंत मानकुमरे आदी उपस्थित होते. डॉ. सुरेश शेडगे यांनी प्रास्ताविक केले. अमित कदम यांनी आभार मानले.राष्ट्रवादीच्या सभामंचकावर ‘रिपाइं’चे पदाधिकारीराष्ट्रवादीचे ‘सातारा-जावळी’चे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ झालेल्या अजित पवारांच्या सभामंचकावर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे उमेदवार जातीयवादी असल्याचा आरोप करत ‘रिपाइं’चे तालुकाध्यक्ष संजय गाडे यांनी विधानसभेला राष्ट्रवादीबरोबर राहणार असल्याची घोषणा केली.