शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

तपासात सरकार अपयशी

By admin | Updated: February 20, 2015 01:04 IST

गोविंद पानसरेंवरील भ्याड हल्ल्याला चार दिवस उलटल्यानंतरही हल्लेखोर किंवा त्यांच्याबाबतचे ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत.

कोल्हापूर : गोविंद पानसरेंवरील भ्याड हल्ल्याला चार दिवस उलटल्यानंतरही हल्लेखोर किंवा त्यांच्याबाबतचे ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत. राज्य सरकार व पोलीस यंत्रणा तपासात अपयशी ठरव्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे केली. सरकार आता नवे राहिलेले नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत येत्या अधिवेशनात त्यांना धारेवर धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. पवार यांनी अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलला भेट देऊन ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री जयंत पाटील व हसन मुश्रीफ त्यांच्यासोबत होते. सरकार कोणाचेही असू दे पण, राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली पाहिजे. आपले विचार ठामपणे मांडणाऱ्या पानसरेंवरील हल्ला महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर हल्ला आहे. नरेंद्र दाभोलकर व पानसरे यांच्यावरील हल्ल्यांत साम्य असल्याचे सध्यातरी दिसते. केंद्र आणि राज्यात जो सत्ताबदल झाला. त्यानंतर हिंदुत्वाच्या नावाखाली काही गोष्टी होत आहेत. त्याचा शोध सरकारने घेतला पाहिजे. या भ्याड हल्ल्यामागे जात्यंध शक्ती आहेत का? हे पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.