आनंदाची बातमी; उजनी धरण प्लसमध्ये आले

By Appasaheb.patil | Published: July 30, 2019 03:16 PM2019-07-30T15:16:08+5:302019-07-30T15:17:49+5:30

पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गेल्या २७ दिवसात धरणामध्ये ३१ टीएमसी एवढे पाणी जमा़

Good news; Ujani dam came in plus | आनंदाची बातमी; उजनी धरण प्लसमध्ये आले

आनंदाची बातमी; उजनी धरण प्लसमध्ये आले

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे जिल्ह्यात पावसाची स्थिती राहिल्यास यंदाही उजनी १०० टक्के भरणे शक्य होणारउजनी हे राज्यातील मोठ्या धरणातील एक धरण असून यात १२१ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमतामंगळवारी दुपारी बारा वाजता धरणाने वजा पातळीतून अधिक पातळीत प्रवेश केला

सोलापूर : राज्यात एकाबाजूला अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र अजूनही पावसाने समाधानकारक सुरूवात केली नाही़़ जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असतानाच एक दिलासादायक बातमी म्हणजे जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण प्लसमध्ये आले असून आजपासून उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात केली आहे. शून्य पातळी ओलांडल्याने बळीराजा सुखावला आहे.

उजनी धरणात सोलापूर जिल्ह्यातील शहर व नदीकाठच्या गावांची आणि शेतीची तहान भागवण्याची ताकद आहे . मात्र सततच्या दुष्काळाने जिल्ह्याची संपूर्ण भिस्त ही याच धरणावरच अवलंबून आहे. गेल्यावर्षी कमी पाऊस पबला मात्र भीमा खोर्यात झालेल्या पावसाने उजनी धरण १०० टक्के भरले. मात्र पाणीटंचाईत जास्त पाणी वापरले गेले. यंदा ३ जुलै रोजी धरण वजा ५९.७४ टक्के अशा नीचांकी पातळीला पोहोचले होते.

यंदा सोलापूर जिल्ह्यात अजूनही पावसाचे समाधानकारक आगमन झाले नसले तरी पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गेल्या २७ दिवसात धरणामध्ये ३१ टीएमसी एवढे पाणी जमा झाल्याने मंगळवारी दुपारी बारा वाजता धरणाने वजा पातळीतून अधिक पातळीत प्रवेश केला आहे़ उजनी हे राज्यातील मोठ्या धरणातील एक धरण असून यात १२१ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. आज उजनी धरणात ६३ टीएमसी पाणी जमा झाले असून याच पद्धतीने काही दिवस पुणे जिल्ह्यात पावसाची स्थिती राहिल्यास यंदाही उजनी १०० टक्के भरणे शक्य होणार आहे .कारण अद्यापही धरणार मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.
-------------
उजनी धरण प्लसमध्ये
दि : ३०/०७/२०१९
दुपारी १ वा 
पाणी पातळी : 491.40
एकूण साठा : 1804.80
उपयुक्त साठा : 1.99
टक्केवारी :  +१.13%
बंडगार्डन विसर्ग : 26824
दौंड विसर्ग : 44462*

Web Title: Good news; Ujani dam came in plus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.