शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

खुशखबर! रेल्वेत बसल्याजागी बाकरवडी, आंबा, स्ट्रॉबेरी..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 7:00 AM

आयआरसीटीसी ई-केटरिंगअंतर्गत फळे व रुचकर पदार्थ प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.

ठळक मुद्दे‘आयआरसीटीसी’ प्रयत्नशीलप्रसिध्द हॉटेलमधील पदार्थही प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जाणार

पुणे : रेल्वेतून प्रवास करताना पुण्यातील प्रसिध्द बाकरवडी, कोकणातील हापुस आंबा अन् महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी खायचीय... मग लवकरच त्याची चव रेल्वेत बसल्याजागी चाखायला मिळणार आहे. इंडियन रेल्वे केटरींग अ‍ॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) ई-केटरिंगअंतर्गत ही फळे व काही रुचकर पदार्थ प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. कोणतीही रेल्वे पुणे स्थानकात येण्यापुर्वी दोन तास आदी ऑर्डर दिल्यानंतर बसल्याजागी हे पदार्थ प्रवाशांना मिळतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. 

रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि प्रसिध्द हॉटेल, बँडचे खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी ‘आयआरसीटीसी’कडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. रेल्वेने लांबपल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा स्थानिक भागातील पदार्थ खाण्याची वेळ येते. स्थानकांवर अनधिकृतपणे या पदार्थांची सर्रास विक्री होते. तसेच प्रवाशांना या भागात प्रसिध्द असलेले पदार्थ मिळत नाहीत. काही प्रवाशांकडून खासगी कंपन्यांच्या अ‍ॅपवरून पदार्थ ऑर्डर केले जातात. पण त्याचा दर्जा चांगला नसतो. दरही खुप जास्त असतात. त्यामुळे प्रवाशांची फसवणुक होते. कोकणातून जाणाºया रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना ई-केटरींगच्या माध्यमातून हापुस आंबा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आता पुणे व परिसरातील तसेच लगतच्या जिल्ह्यांमधील लोकांच्या जिभेचे चोचले पुरविणारे पदार्थ देण्याचा विचार ‘आयआरसीटीसी’कडून केला जात आहे. पुण्यातील प्रसिध्द बाकरवडी, महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी, प्रसिध्द चिवडा, वेफर्स असे विविध पदार्थ ई-केटरींगवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये हापुस आंब्याचीही भर पडणार आहे. तसेच पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या किमान एक किलोमीटर अंतरातील प्रसिध्द हॉटेलमधील पदार्थही प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यांच्याशी याबाबतचा करार केला जाईल. खाद्यपदार्थांचा दर्जा आणि दर पाहूनच हे पदार्थ ई-केटरिंगवर मिळतील. प्रवाशांना आयआरसीटीसीचे संकेतस्थलळावर किंवा अ‍ॅपच्या माध्यमातून या पदार्थांची आॅर्डर देता येईल. सध्या पिझ्झा, बर्गरसह काही हॉटेलमधील जेवण यावर उपलब्ध आहे. 

.............

पुणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांसह इतर प्रमुख स्थानकांवरही पुण्यातील प्रसिध्द रुचकर पदार्थ खायला मिळावेत, ही उद्देश आहे. तसेच स्टॉबेरी, आंब्याची चवही चाखता यावी, यासाठी ई-केटरिंगवर उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. या पदार्थांच्या दर्जाची खात्री असेल. ‘आयआरसीटीसी’कडून तपासणी करून हे पदार्थ प्रवाशांना दिले जातील. त्यासाठी दोन तास आधी आॅर्डर द्यावी लागेल. संबंधित विक्रेत्यांकडून गाडी स्थानकात आल्यानंतर संबंधित पदार्थ प्रवाशांना मिळतील. सध्या मोजकेच पदार्थ उपलब्ध असून त्याचे प्रमाण वाढविले जात आहे.- गुरूराज सोना, सहायक व्यवस्थापक, आयआरसीटीसी, पुणे

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेfoodअन्नfruitsफळेpassengerप्रवासी