सोन्याची विक्री पंधरवड्यात ३० टक्क्यांनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 05:17 IST2019-10-15T05:16:54+5:302019-10-15T05:17:01+5:30

गेल्या पंधरवड्यातील चित्र : सण-उत्सव व लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी लगबग

Gold sales increased 30% in a fortnight | सोन्याची विक्री पंधरवड्यात ३० टक्क्यांनी वाढली

सोन्याची विक्री पंधरवड्यात ३० टक्क्यांनी वाढली

जळगाव : नवरात्र व विजयादशमी यामुळे सुवर्णनगरी जळगावात दोन आठवड्यांमध्ये सोन्याची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक मंदी असतानाही दिवसेंदिवस सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असल्याने येथे नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. दसऱ्याला तर शहरातील सुवर्ण पेढी गजबजून गेल्या होत्या. सोमवारी येथे सोन्याचा भाव ३८,४०० रुपये तर चांदीचा ४६ हजार रुपये भाव होता. गेल्या पंधरवड्यात सोन्याची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे. ज्या ठिकाणी एक किलो सोने विक्री होत असे तेथे आता ते सव्वा किलोच्यावर विक्री होत असल्याची माहिती मिळाली. दिवाळी आणि लग्नसराईदेखील जवळ येत असल्याने खरेदीची लगबग वाढली आहे.


चार वर्षांच्या तुलनेचा विचार केला तर आताची ही मागणी अद्यापही त्या प्रमाणात नसल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकार ईश्वरलाल जैन यांनी सांगितले. यंदा चांगला पाऊस झाला असला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या हाती पैसा आलेला नाही. दिवाळीमध्ये चांगल्या व्यवसायाची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

नवरात्र उत्सवापासून सोन्याची मागणी चांगली वाढली असून ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यात गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी केली जात आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

Web Title: Gold sales increased 30% in a fortnight