शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नाव बदलण्यापेक्षा पाणी द्या !

By admin | Updated: September 2, 2015 01:20 IST

औरंगाबाद शहराचे नाव बदलविण्याचा विचार सध्या बोलला जात आहे. पण अकारण एखाद्या शहराचे नाव बदलणे म्हणजे इतिहास बदलण्यासारखे आहे.

नागपूर : औरंगाबाद शहराचे नाव बदलविण्याचा विचार सध्या बोलला जात आहे. पण अकारण एखाद्या शहराचे नाव बदलणे म्हणजे इतिहास बदलण्यासारखे आहे. असा इतिहास बदलणे मला मान्य नाही. त्यापेक्षा तेथील लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करा, असे रोखठोक मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. नागपुरात आले असताना ते म्हणाले, की साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला सन्मानाने मिळाले नाही म्हणून मी संमेलनाच्या विरोधात बोलतो, असे काहीही नाही. हा आरोप निराधार आहे. मला संमेलनाध्यक्षपद स्वीकारण्याची अटच टाकली आणि विनंती, आग्रह झालाच तर मला अध्यक्ष व्हायला आवडेल. पण ते संमेलन अखेरचे असले पाहिजे. साहित्य क्षेत्रातला दहशतवादी असल्याचा आरोप माझ्यावर कुणी करीत असेल तर असे म्हणणारे लोक किती भित्रे आहेत, ते समजून घेण्याची गरज आहे. मी साधा, सरळ माणूस आहे. मी बोललो की वाद होतो, पण मी स्वत:हून बोलत नाही. कुणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर मी देतो. लाखावर वेतन घेणाऱ्या प्राध्यापकांनी त्यांच्या विषयाचे ज्ञान मराठीत आणल्याशिवाय त्यांना निवृत्तीवेतन देऊ नये, असा आदेशच शासनाने काढायला हवा. त्याशिवाय वैश्विक ज्ञान मराठीत येणार नाही. हिंदू कादंबरीच्या ४५ हजार प्रती विकल्या़ यातून वाचन वाढते आहे, हे सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. मलाही ठार माराल का ?दाभोलकर, पानसरे आणि आता कर्नाटकातील विचारवंत कलबुर्गी यांची हत्या होण्यामागे काही षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे तालिबान आहे की पाकिस्तान? मी स्पष्ट बोलतो म्हणून मलाही ठार कराल का? गांधी, फुले, आंबेडकरांचे विचारही लोकांना पटले नव्हते; पण त्यांच्याच विचारातून क्रांती झाली, हे नाकारता येत नाही. पोलिसांनी संबंधित हत्या प्रकरणांची चौकशी केल्याशिवाय त्यांचे वेतनच द्यायला नको, असे नेमाडे म्हणाले.