शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव मोबदला व विकसित जमीन द्या!

By admin | Updated: September 4, 2014 00:52 IST

बोर्इंगचा टॅक्सी-वे शिवणगावातील शेतकऱ्यांच्या कठोर विरोधामुळे बंद पडला होता. पण आता शेतकऱ्यांचा विरोधाला न जुमानता आणि शेतीचा मोबदला न देता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने

प्रकल्पग्रस्तांची मागणी : एमएडीसीचे अतिक्रमण नागपूर : बोर्इंगचा टॅक्सी-वे शिवणगावातील शेतकऱ्यांच्या कठोर विरोधामुळे बंद पडला होता. पण आता शेतकऱ्यांचा विरोधाला न जुमानता आणि शेतीचा मोबदला न देता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) शेतात जबरदस्तीने अतिक्रमण करून टॅक्सी-वेचे काम सुरू केल्याने गावकऱ्यांमध्ये असंतोष आहे. याच कारणाने पुनर्वसनाअभावी वर्धा मार्गावरून गावाला जोडणारा रस्ता बंद होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शिवणगावातील लोकांची पर्वा न करता कामे सुरू करा, असे आदेश अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी अतिक्रमण करून कामे सुरू केली आहेत. विकास कामे तर सुरू केली, पण नवीन कंपन्या येण्यावर प्रश्नचिन्ह आहे. शेतमालक मोहन डवरे यांनी चर्चेनंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) हेतूवर शंका व्यक्त केली. त्यांनी हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे. एमएडीसीने पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित ठेवला आहे. टॅक्सी-वेच्या पूर्णत्वानंतर कंपनी आम्हाला वाऱ्यावर सोडेल, अशी भीती प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली. वाढीव मोबदला द्याटॅक्सी-वेच्या मधोमध असलेल्या शेताचा मोबदला देण्यास एमएडीसीला अपयश आल्याने, गेल्या सहा महिन्यांपासून काम बंद होते. पण आता मोबदला न देताच काम सुरू केल्याने एमएडीसीच्या भूमिकेवर प्रकल्पग्रस्तांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बाजारभावानुसार शेतीचा वाढीव मोबदला, १२.५ टक्के विकसित जमीन, संपूर्ण गावाचे पुनर्वसन अशी शिवणगावासीयांची मागणी आहे. छोट्या छोट्या समस्या सोडविण्यात एमएडीसीचे अधिकारी उत्सुक नाहीत. त्याच कारणामुळे गेल्या दहा वर्षांपासून मिहानचा विकास संथ आहे. नवीन कंपन्यांनीही पाठ फिरविली आहे. अस्तित्वातील कंपन्या विस्तार बाहेर करीत आहेत; शिवाय स्थानिक रोजगारापासून वंचित आहेत. २७ सोयीसुविधा असाव्यातशिवणगाव मनपा हद्दीत असल्याने येथील शेतकऱ्यांचे पुनर्वसन चिंचभुवन येथे होणार असल्याची माहिती एमएडीसीचे अधिकारी गेल्या पाच वर्षांपासून देत आहेत. पण पुनर्वसन कागदपत्रांपलीकडे गेले नाही. पुनर्वसन करताना २७ प्रकारच्या सोयीसुविधा असाव्यात, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. प्रकल्पग्रस्तांना चिंचभुवन येथे विकसित प्लॉट मिळणार आहे. केवळ प्लॉट पाडून होणार नाही, तर त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास हवा. आज काम सुरू झाले तर वर्षभराचा कालावधी लागणार आहे.(प्रतिनिधी)