शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

२० लाख द्या, तुमचा विजय निश्चित!

By admin | Updated: July 31, 2014 03:59 IST

नरेंद्र मोदी यांनी मीडिया मॅनेजमेंट, सोशल मीडियाचा खुबीने वापर केल्याने ते लोकसभा निवडणुकीत जिंकले

यदु जोशी, मुंबईनरेंद्र मोदी यांनी मीडिया मॅनेजमेंट, सोशल मीडियाचा खुबीने वापर केल्याने ते लोकसभा निवडणुकीत जिंकले असा दृढ समज झालेले सर्वच राजकीय पक्षांचे लहानमोठे नेते आता पीआर एजन्सी, माध्यम तज्ज्ञांच्या नादी लागले आहेत. नेत्यांच्या बंगल्यांवर, कार्यालयांमध्ये, विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये सध्या अशा या इलेक्शन गुरुंची लगबग दिसत आहे. या शिवाय सर्वेक्षण या शब्दाचा सध्या राजकीय वर्तुळात जबरदस्त बोलबाला आहे. एकेका मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने सर्वेक्षण करून देणाऱ्या एजन्सी आणि व्यक्तींचे सध्या एकच पेव फुटले आहे. जननेता, नेत्यांचा नेता, कल्पक नेता, मीडिया गुरू, जननायक अशा वेगवेगळ्या नावांनी या एजन्सी थाटण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणाचे काम आमच्यावर सोपवा, आम्हाला अमूक रक्कम द्या, आम्ही सर्वेक्षणापासून विजयापर्यंतचे अख्खे पॅकेज तुम्हाला देतो, अशी आॅफर इच्छुक उमेदवारांना दिली जात आहे. अनेक जण त्यासाठी पैसा खर्च करीत आहेत. १०, २०, ३० लाख असे पॅकेज आॅफर केले जात आहे.‘तुमच्या मतदारसंघात आम्ही सर्वेक्षण करू, आता उरलेल्या दोन महिन्यांत कशी प्रसिद्धी मिळविली पाहिजे, त्यासाठी काय काय केले पाहिजे, कोणते छापील साहित्य वाटले पाहिजे, होर्डिंग कुठे लावले पाहिजेत, त्यावर मजकूर काय असला पाहिजे, निवडणुकीसाठी घोषणा कोणत्या असाव्यात, व्हॉटस् अप, फेसबूकवर कसा प्रचार करायचा याचे मंत्र सांगितले जात आहेत. मंत्री, राजकीय पक्षांची कार्यालये, विद्यमान आमदार, आमदारकीसाठीचे काही इच्छुक त्यांच्यामुळे त्रस्त आहेत. निवडणूक कशी जिंकायची याचे फॉर्म्यूले विकले जात आहेत. काँग्रेसच्या कार्यालयात एक पोल गुरु भेटला. तो म्हणाला मी फक्त मतदानाच्या दिवशीची व्यवस्था करतो. म्हणजे, मतदान केंद्रांवर असलेल्या कार्यकर्त्यांना फूड पॅकेटस् पोहोचविणे, मतदानाच्या आधी आणि त्या दिवशी मतदारांना स्लिप्स् पोहोचविणे, मतदानाच्या आदल्या रात्री करावी लागणारी व्यवस्था आदी. त्याला काँग्रेसच्या कार्यालयात कोणी दाद दिली नाही.