आंघोळ करणा-या मुलीचे छायाचित्रण करणा-या आरोपीला संतप्त जमावाने बदडले

By Admin | Updated: August 18, 2016 14:52 IST2016-08-18T14:52:05+5:302016-08-18T14:52:05+5:30

आंघोळ करणा-या शाळकरी मुलीचे मोबाईलमध्ये छायाचित्रण करणा-या आरोपीला संतप्त जमावाने अक्षरश: बदडून काढले

The girl who was shaking the girl's bathing student has got angry mob | आंघोळ करणा-या मुलीचे छायाचित्रण करणा-या आरोपीला संतप्त जमावाने बदडले

आंघोळ करणा-या मुलीचे छायाचित्रण करणा-या आरोपीला संतप्त जमावाने बदडले

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १८ - आंघोळ करणा-या शाळकरी मुलीचे  मोबाईलमध्ये छायाचित्रण करणा-या आरोपीला संतप्त जमावाने अक्षरश: बदडून काढले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. सीताबर्डीतील काछीपुरा परिसरात बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली.
 नागेश भगवान सोनकुसरे (वय ३५) असे आरोपीचे नाव असून, तो काछीपु-यात राहतो. पीडित मुलगी १५ वर्षांची असून, ती दहावीची विद्यार्थीनी आहे. बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ती घरातील टिनाच्या बाथरूममध्ये आंघोळ करीत होती. शेजारी राहणारा आरोपी सोनकुसरे हा बाथरूमच्या बाजूला लपून बसला. त्याने मोबाईलमधून टिनाच्या फटीतून आंघोळ करणा-या मुलीचे छायाचित्रण सुरू केले. मुलीला ते दिसल्याने तिने आरडाओरड केली. त्यामुळे तिचे पालक आणि आजूबाजूची मंडळी जमा झाली. त्यांनी सोनकुसरेला पकडून बेदम चोप दिला. त्याचा मोबाईलही फोडला. संतप्त जमावातील एकाने या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. त्यामुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संतप्त जमावाने आरोपी सोनकुसरेला पोलिसांच्या हवाली केले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून सीताबर्डी ठाण्यात आरोपी सोनकुसरेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: The girl who was shaking the girl's bathing student has got angry mob