दोन लाखांत मुलीचा सौदा

By Admin | Updated: October 26, 2015 02:36 IST2015-10-26T02:36:04+5:302015-10-26T02:36:04+5:30

सावत्र आईने अल्पवयीन मुलीचा दोन लाखांत सौदा केल्यानंतर संबंधितांनी तिला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला

Girl deal in two lakhs | दोन लाखांत मुलीचा सौदा

दोन लाखांत मुलीचा सौदा

औरंगाबाद : सावत्र आईने अल्पवयीन मुलीचा दोन लाखांत सौदा केल्यानंतर संबंधितांनी तिला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे पीडित मुलीच्या तक्रारीनंतर उघड झाले आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून सातारा (औरंगाबाद) पोलीस ठाण्यात सावत्र आईसह सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिरोज घारिया, महंमद अली, सिराज शेख, नवशाद मुसा शेख, पीडित मुलीची सावत्र आई व अन्य एक महिला (सर्व रा. गोविंदवाडी, रेतीबंदर, कल्याण) अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत.
सातारा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महांडुळे यांनी सांगितले की, पीडित मुलीचे कुटुंब सातारा परिसरात कामानिमित्त राहायला आले आहे. तिची सावत्र आई वेगळी राहते. २० सप्टेंबरला फिरोज घारिया व महंमद अली यांनी मुलीला गोविंदवाडी येथे एकटे गाठून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला ‘तुझ्या आईने तुला दोन लाख रुपयांना विकले आहे’ असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Girl deal in two lakhs