शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

‘जेनेटिक प्रॉब्लेम’ची मनसेत लागण

By admin | Updated: September 8, 2014 02:56 IST

पक्षाचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर, आदित्य शिरोडकर, राम कदम आणि संजय घाडी अशा काही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीचे मैदान सोडण्याची तयारी केल्याची या पक्षात चर्चा सुरू झाली आहे.

संदीप प्रधान, मुंबईमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा फेरविचार सुरू केल्याने या पक्षाचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर, आदित्य शिरोडकर, राम कदम आणि संजय घाडी अशा काही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीचे मैदान सोडण्याची तयारी केल्याची या पक्षात चर्चा सुरू झाली आहे.राज यांनी आपल्या या विधानाचे खुलासे केले असले तरी ठामपणे निवडणूक लढवणारच असे स्पष्ट केलेले नाही. त्याचा परिणाम म्हणून की काय किंवा लोकसभा निकालानंतर विजयाची खात्री नसल्याने मनसेच्या अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईत शिवडीतून बाळा नांदगावकर हे निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा आहे. मनसेचे आमदार राम कदम हे मनसेतून भाजपामध्ये जाण्याच्या खटपटीत असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले. कदम यांच्या कार्यशैलीवरून त्यांचे राज यांच्याशी खटके उडाले. त्यानंतरही त्यांची उमेदवारी पक्की होती. परंतु आता त्यांच्या घाटकोपर मतदारसंघातून दिलीप लांडे यांना उमेदवारी देण्याचे घाटत असल्याचे कळते. लोकसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेले आदित्य शिरोडकर हे वरळीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र आता तेही फारसे इच्छुक नसल्याची चर्चा आहे. मागील विधानसभा निवडणूक विलेपार्ले मतदारसंघातून लढवलेले शिरीष पारकर हे गेले दीड वर्ष पक्षात दुर्लक्षित आहेत. त्यामुळे तेही पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता नाही.लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली गेलेले महेश मांजरेकर व अभिजित पानसे विधानसभा निवडणुकीत पुन्हा नशीब अजमावणार किंवा कसे, याबाबत चित्र धूसर आहे. मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांना अचानक चिपळूणची तर संजय घाडी यांना कणकवलीची एसटी पकडून तेथे उमेदवारीकरिता जाण्याचे फर्मान ‘कृष्णकुंज’कडून काढण्यात आले आहे. मात्र पक्षाकरिता अनुकूल वातावरण नसताना इतक्या ऐनवेळी तेथे जाऊन पराभव पत्करण्यास व खिशाला खार लावून घेण्यास या दोघांकडून का-कू केले जात आहे. सध्या रत्नागिरीकरिताही ‘कृष्णकुंज’कडून उमेदवाराचा शोध सुरू असल्याने रत्नागिरीशी दुरान्वयाने का होईना संबंध असलेले मनसे नेते धास्तावले आहेत. त्याचवेळी परशुराम उपरकर (सावंतवाडी), वैभव खेडेकर (दापोली) तर अधिक शिरोडकर यांचे पुत्र अ‍ॅड. राजेंद्र शिरोडकर (मलबार हिल) यांना वर्षभरापूर्वी या मतदारसंघात काम सुुरू करण्याचा आदेश राज यांनी दिल्याने ते निवडणुकीची कसून तयारी करीत आहेत.