अपहृत महिलेवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: June 25, 2014 01:22 IST2014-06-25T01:22:15+5:302014-06-25T01:22:15+5:30

शहरातील 24 वर्षाच्या महिलेला नोकरीचे आमिष दाखवून मध्य प्रदेशातील खंडवा येथे पळवून नेऊन तिच्यावर तेथे 11 इसमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Gangraped woman raped | अपहृत महिलेवर सामूहिक बलात्कार

अपहृत महिलेवर सामूहिक बलात्कार

>उल्हासनगर : शहरातील 24 वर्षाच्या महिलेला नोकरीचे आमिष दाखवून मध्य प्रदेशातील खंडवा येथे पळवून नेऊन तिच्यावर तेथे 11 इसमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन महिलांसह 11 जणावर गुन्हा दाखल झाला आहे.  
उल्हासनगर कॅम्प नं़ 4, आशेळे पाडय़ात राहणा:या या महिलेला रश्मी ऊर्फ ज्योती किशोर चांदवाणी व नीतू ऊर्फ कोमल हितेश रिवानी यांनी भरपूर पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून 3क् एप्रिल रोजी पंजाब मेलने खंडवा येथे नेले व तिला अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात देऊन पलायन केले. 1क् ते 11 अनोळखी इसमांनी महिलेला खंडव्यातील झोपडपट्टीत नेऊन सलग दोन दिवस सामूहिक बलात्कार केले व इतरांसोबत संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. या महिलेने पळ काढून, रेल्वेद्वारे उल्हासनगर गाठले व नातेवाइकाच्या मदतीने तक्रार दाखल केली़ पोलिसांनी अपहरणकत्र्या दोन महिलांसह 11 जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.  (प्रतिनिधी)
 
च्पीडित महिलेच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन महिलांसह 11 जणांवर गुन्हे दाखल. 
च् दोन्ही आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Gangraped woman raped